नवीन विचारांची मांडणी करताना काही वेळा वेगळा
विचार करणे गरजेचे वाटते, कुठलाही बदल सहज घडत नसतो, तो घडवण्यासाठी विचारांची आणि
कष्टांची धडपड लागते. मागील काही दिवसापासून मनात बदलाचे वारे वाहत आहे, आणि विशेष
म्हणजे नवीन बदलाचे. ठरलेल्या पठडीत दिवस घालवण्यास विशष उत्साह दिसून येत नाही,
किंवा गेलेल्या दिवसाकडून संध्याकाळी काही मागायचे म्हटले तर देण्यासारखे काही उरत
नाही. बदल सहजा-सहजी मनात रुजत नसतो. खूप व्यतेय येतात, खूप अडचणी असतात. कदाचित
मनाला तो बदल मनातून आवडलेले नसतो, कारण मन हे भावनिक गुंत्यात जास्त रमते व तशीच
सवय शरीराला लागते आणि त्यामुळेच बदल शरीराला झेपत नसतील. मात्र एकदा बदल घडला तर
सुरवातीला त्रास होतो नंतर पुन्हा हे मन पहिल्या सारखे नवीन बदलात ही गुंतते.
कशात तरी गुंतून राहणे हा कदाचीत मनाचा स्वभाव
असावा किंवा त्याला ते आवडत आसवे पण गुंतलेल्या विश्वातून सोडून न घेता दुसऱ्या
गुंत्यात गुंतणे हे मनाचे नसते उद्योग असतात. लहान बाळा प्रमाणे दोन्ही हातातील दोन्ही
गोष्टी न सोडणे हे मनालाच शोभते. म्हणूनच आस वाटत आला की काही बदल हवा आहे ज्यातून
मनास काही विरंगुळा मिळायला हवा व नवीन गुंता-गुंती घडायास हव्यात.
Sprouts…
