Sunday, 31 December 2017

नवं स्वागत_नवं प्रेरणेचे

तसे तर येणारा प्रत्येक दिवस नविन व प्रत्येक नवीन क्षण चैतन्याने भरलेला, असं मानणाऱ्या संस्कृतीत व समाजात मी वाढलेलो असल्यामुळे नवीन दिवसाचे किंवा वर्षाचे  स्वागत त्यातल्या त्यात इंग्रजी नवीन वर्षाचे स्वागत करण्यात मला फार काही रस वाटत नाही, पण कोठून तरी सुरवात असावी आणि कोठे तरी अंत किंवा समाप्ती म्हणून हे परिमापक मान्य केल्यास येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत करणे जरुरीचे वाटते. तस मी काही फार मोठा किंवा प्रसिद्ध व्यक्ती नसल्यामुळे सरत्या वर्षांचा हिशोब मांडणे व येणाऱ्या वर्षाचे उद्दिष्ट ठरवणे असे काही नाही पण एक छोटासा प्रयंत्न सरत्या वर्षाकडून आपल्याला काय मिळाले याचा व येणाऱ्या नवीन वर्षा कडून अपेक्षा मांडण्याचा प्रयंत्न करण्यास काय हरकत आहे. २०१७ हे नाविन्याची भरलेले वर्ष होते असे म्हणता येईल, आठवणींची उजळणी करणे हे उद्दिष्ट नाही पण झालेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून वार्षिक विश्लेषण करावे असे वाटते. घरात बसल्यावर एकट्याने दिवस भराच्या घटनांचा पाढा वाचला म्हणजे कळते दिवस कसा गेला आणि रात्री झोप ही निवांत लागते, त्या प्रमाने जीवनात काही वेळा किंवा ठरावीक अंतरा वरून आयुष्याची उजळणी करण्यास काहीच हरकत नसते. 

वर्षभरतील काही घटनां प्रचंड आशादायी व ऊर्जाने भरलेल्या असतात तर काही निराशादायक असतात. ज्या ऊर्जादायी घटना असतात त्यातून प्रचंड प्रेरणा मिळते व त्या त्या क्षेत्रात काम करण्याची उत्सुकता वाढते मात्र निराशाजनक घटनांचा परिणाम स्वतःवर होऊ न देणे हे खरी कसोटीचे असते. खूप वेळा असे दिसून येते की ज्या नकारार्थी घटनां असतात त्यांचा परिणाम जास्त आणि लवकर दिसून येतो पण तो अल्प काळचा असतो तर आशादायी घटनांचा परिणाम दीर्घकाळ असतो मात्र सावकाश दिसून येतो. सरत्या वर्षातून आशा मोजक्याचं आशादायी घटनांची शिदोरी घेऊन नकारार्थी घटनांना, विचारांना मूठ-माती देऊन नवीन वर्षात प्रवेश करणे म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत असू शकते. 

फुलांचा गुच्छ घेऊन, रात्री बारा वाजता दरवाजा उघडून कोणचे स्वागत करणार ??? रात्रीच्या प्रचंड काळोखाचे !!! की उगवत्या सूर्यातुन येणाऱ्या चैतन्यदायी व नवं-आशादायी सूर्य किरणांचे !!! हे ठरवणे आपल्या हातात आहे. सरत्या वर्षातील आशादायी व प्रेरणादायी घटनां मी पहाटेच्या नवं-किरणांच्या साक्षीने नवीन वर्षात आणल्या आहेत, आणि ध्येयं प्राप्ती करीताची हीच शिदोरी असू शकते.  


धन्यवाद                                            विराज

Sunday, 17 December 2017

वेळमावस्य....!!! ग्रामीण मराठवाडा ते ग्लोबल मराठवाडा


मार्गशीष अमावस्या म्हणजेच दर्शवेळ किंवा येळमावस्य दर वर्षी हा दिवस डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात येतो. तसे ही साधी अमावस्या पण मराठवाड्यातील काही भागात म्हणजे लातूर उस्मानाबाद जिल्यात आणि कर्नाटकाच्या काही भागात हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागातला उत्सव असल्यामुळे शेतीशी संबंध आलाच, हिवाळ्याचे दिवस मराठवाड्यात या दिवसात बोचरी थंडी असते, वर्षभर तसे तापमान जास्त असलेला हा भाग त्यामुळे ही बोचरी थंडी सुद्धा सुखावह असते, त्यात खरिपाची जवळ जवळ सर्वच पीक हातात आलेले असतात, रब्बीची सुद्धा पेरणी झालेली असते अशा वेळी क्षणभर विश्रांती या वेळी हा उत्सव साजरा केला जातो.  शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतात जाऊन हा उत्सव साजरा करतात, शेतातील रम्य परिसर, रब्बीचे पिके मग गहू, ज्वारी, हरबरा फळ पिके पेरू,बोर, चिंचा, सीताफळ, डाळींब, ऊस या सगळंनी शेती बहरलेली असते. पोहण्याचा मनसोक्त आनंद मग विहरीत असे किंवा नद्यांत (सध्या मराठवाड्यात पाऊस काळ चांगला झाला आहे) उबदार सूर्य प्रकाश आणि थंड हवा यामुळे वातावरण आनंदी आणि प्रफुल्लित होते. मुख्य कार्यक्रम साधाच असतो छोटीशी शेतातील पूजा आणि त्यानंतर वन भोजनाचा आस्वाद असतो. 
हे भोजन पूर्णपणे शेतात तयार केले आणि जास्तीत जास्त शेती उत्पादनाचा वापर केलेला असते. सहसा शाकाहारी जेवन असते पण मांसाहार सुद्धा आवडीनुसार असू शकतो. एक प्रकारे कृतज्ञ: सोहळा असतो शेती बद्दलचा. शेतकरी आपल्या जवळचे नातलग-मित्रपरिवार घेऊन त्याच्या शेतात ग्रामीण संमेलन साजरे करत असतो. पारंपारिक वेशभूषा, लोककला, आणी ग्रामीण जेवणाचा आनंद लुटत असतो. ज्यातून तो गेल्या सहा महिन्यातील त्याच्या कष्टाचे प्रदर्शन तर मांडतोच पण यातून कृषी पर्यटनाला सुद्धा वाव मिळतो. 



कृषी प्रधान देशात कृषी पर्यटन आणि उत्सव (agritourism & event) हे ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याचे चांगले साधन आहे. मुळात आज भारत सारख्या देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे पण त्यातून मिळणारे उत्पन्न तसे तोकडे म्हणून आज कृषी क्षेत्रा कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी उत्पादनास थेट बाजारात नेण्या एवजी त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणणे व योग्य विपणन करणे(Marketing) गरजेचे आहे. त्याच बरोबर या प्रक्रिया उत्पादनंचे merchandising सुद्धा जरुरीचे आहे आणि वेळमावस्य सारख्या कृषी पर्यटन उत्सवातून हे सद्य होऊ शकते. कोकणातील पोफटी पार्टी, जळगांव खान्देशातील शेव भाजी -वांग भरीत पार्टी, हुरडा पार्टी या सारख्या ग्रामीण उत्सवातून कृषी अर्थव्यवस्थेची प्रगती होऊ शकते. agritourism करता या Rural event फार फायदेशीर ठरू शकतात. 



Wednesday, 18 October 2017

दिवाळी फराळ

आज पासून ४ दिवस दिवाळी सुट्टी वर जात आहे, तशी कमीच सुट्टी आहे या वर्षी, महिन्याच्या मध्ये किंवा शेवटी दिवाळी आली की कमीच सुट्ट्या मिळतात असो. या दिवाळीत सुद्धा माझा सोबत असणार आहेत ते दिवाळी अंक. खरे तर या दिवाळीत माझा प्लॅन काही वेगळाच आहे, चार दिवस चार गावे फिरावी लागणार आहेत, पहिला दिवस अर्थात औरंगाबाद, दुसरा उस्मानाबाद, तिसरा कळंब आणि चौथा तेर आणि वापस पुणे. सुट्टी तील प्रवास तस खूप बोर करणारा असतो त्यात स्वतः गाडी चालवत न्यायाची म्हणजे आणखीनच त्रास, इतर सर्व मज्जा करत असतात आणि आपण म्हणजे समोरून येणाऱ्या गाड्या मोजत असतो नाहीतर राहिलेले किलोमीटर बघत असतो. कंटाळवाणे होते गाडी चालवणे आणि त्यात कोणी शिकवायला असले म्हणजे झाले. वैताग येतो, लॉंग ड्राईव्ह-नाईट ड्राईव्ह पुळचट कल्पना वाटतात. 
त्याच बरोबर या दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे, आम्ही घरचे सगळे उस्मानाबाद येथे दिवाळीला असणार आहेत, विशेष म्हणजे दिवाळीचे तीन दिवस आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातच राहणार आहोत. पाच वर्षांनी आम्ही उस्मानाबाद ला दिवाळी करणार आहोत. लहानपनी उस्मानाबादच्या दिवाळीची तशी औरच मज्जा असायची. एकतर फटाके उडवायला कसलीच अडचण नसायची, खूप मोठे पटांगण आणि तेवढे मोठ घरा समोरील अंगण असल्या मुळे खूप फटाके उडवता येत होते. दुसरे म्हणजे खाण्या पिण्याची चांगळ असायची, कॉलनीतील व शाळेतील जुने मित्र-मैत्रिणी भेटायच्या, नातलग आणि मित्रपरिवार भेटायचा. तसे माझ्या घरातले मिळूनच आम्ही सात आठ  भाऊ-बहिण एकत्र असायचो. खूप धमाल यायची, दिवाळीच्या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान झाल्यावर माझे वडील किंवा चुलते फटाक्यांची सर्व भावंडात समान वाटणी करायचे व तेवढेच फटाके दिवस भर आम्ही उडवायचो. फटक्यात अपटबार, लवंगी फटका, लक्ष्मी तोटा, सुतळी बॉम्ब हे दिवसा उडावण्या साठी तर रात्री साठी झाड, भुईचक्कर, रॉकेट असायचे. किल्ला फार कधी बांधला नाही पण मातीत किंवा वाळूच्या ढीगाभाऱ्यात सुतळी बॉम्ब लावून उडवायचो, मज्जा यायची.


पोटभर फराळ चोपून झाल्यावर घरात पत्ते खेळत बसने व्हायचे किंवा क्रिकेट खेळायचो माझा दोन्ही काका, माझे वडील आणी आम्ही सर्व भावंडं मिळून क्रिकेट खेळायचो. घरात मोठे अंगण असल्यामुळे एक टप्पा आऊट क्रिकेट खेळायला मज्जा यायची. दिवाळीच्या चार पाच दिवसात रोज नवीन पदार्थ खाणे व्हायचे. तसे माझ्या चुलत काकांचे घर सुद्धा उस्मानाबादला असल्यामुळे त्यांच्या कडे सुद्धा जाणे व्हायचे. पुस्तकं वाचन त्यावेळी कमीच होते, कारण अभ्यासाच्या पुस्तकामुळे इतर पुस्तके वाचण्यात रसच राहायचा नाही.
एकत्र कुटुंब पद्धतीतील दिवाळी साजरी करताना एक वेगळाच आनंद व्हायचा. अजून सुद्धा घरातले सर्व एकत्र दिवाळी साजरी करतोत. आता सर्व भावंडांची लग्न झाली आहेत आणि कधी औरंगाबादला तर कधी पुणे किंवा अकलूज ला दिवाळी होते पण उस्मानाबादची दिवाळी काही औरच असायची....

Friday, 8 September 2017

Lenovo ThinkPad 430

मागील १० वर्षा पासून ज्या एका गोष्टी/वस्तू सोबत आसल्यामुळे कुठल्याही समस्येवर मत करण्याची शक्ती, आत्मविश्वास मिळाला, असे एक संकलन ज्यामुळे वेगवेगळ्या प्रकारे विचार करायला शिकलो, नावीन्यपूर्ण आणि उत्कृष्टता याचे एकत्रित स्वरुप. खूप काही शिकले आणि खुप शिकायचे आहे आशी वस्तू म्हणजे माझा laptop “#Lenovo_ThinkPad_430”. Last Tuesday I lost it, It is painful for me, I was truely addicted of it, I was highly dependable on it. It was source of knowledge, energy & motivation. या laptop सोबतची अजून एक मजेशीर आठवन म्हणजे याच्या सोबत मिळालेले leading brand चा cell phone, "#Blackberry” आणि त्यामुळे जोडला गेलेला Social Networking चा व्यासंग SMS च्या जमान्यात मी #BBM वर होतो (पन दुसऱ्या बाजूने बोलायला कोणी नसायचे, ही वेगळी गोष्ट)
With it I was work on #Nielsen, Market research project, Social Networking Project like #Shivshakti_Sangam, CSR activity #Samarth_Bharat & #MAYArelated work. It had close association with me.
I have many sweet memories with it. From last some month it was suffering from many disorders but till last breath it delivered services truthfully. It is really painful

to get seperate from it. I leave it in memories. Thank you Lenovo ThinkPad 430.

Sunday, 9 July 2017

!! गुरुपण !!

एखाद्याला मोठे करणारा गुरु आसतो,
एखाद्याचा छोटेपणा दाखवणारा गुरु आसतो !!
एखाद्याला निरक्षराला साक्षर करणारा गुरु आसतो,
एखाद्या साक्षराला सु-संस्कृत करणारा गुरु आसतो !!
एखाद्याचा मित्र गुरु आसतो,
एखाद्याचा शत्रू गुरु आसतो !!
एखादा वयाच्या मोठेपणात गुरु आसतो,
एखादा वयाच्या लहानपणात गुरु आसतो !!
एखाद्याच्या गुणउधळण्यात गुरु आसतो,
एखाद्याच्या कला-गुणांत गुरु आसतो !!
एखाद्याच्या प्रारब्धात गुरु आसतो,
एखाद्याच्या प्रयत्नात गुरु आसतो !!
श्रीमंतीच्या प्रदर्शनात गुरु आसतो,
गरिबीच्या दर्शनात गुरु आसतो !!
आध्यात्माच्या दांभिकपणात गुरु आसतो,
चैतन्य स्वरूपात गुरु आसतो !!
वंचितांच्या शोषणात गुरु आसतो,
वंचितांच्या सेवार्थ गुरु आसतो !!
कधी पदव्यांच्या (Degree) प्रदर्शनात गुरु आसतो,
कधी नापासांच्या गर्दीत गुरु आसतो !!
कधी वाटाड्या गुरु आसतो,
कधी वाट चुकवणारा गुरु आसतो !!


Saturday, 1 April 2017

दारू...मित्र जोडण्याचे साधन

माणसे जोडणे आणि विशेष करून मित्र करून जोडणे ही एक कला आसते, काही लोकांना ती अवगत असते, न्हवे तर ती जन्मजात उपजतच असते, त्या प्रमाणेच काही वस्तू किंवा गोष्टी असतात त्यांना सुद्धा “ही” कला अवगत आसते. व्यक्ती किंवा व्यक्ती-समूह त्या वस्तु कडे आपसूकच आकर्षित होत असतात जसे की पत्ते, तंबाखू, चावडी, चहाचा स्टाँल, आणि त्याच प्रमाणे “दारू”
दारूत हा गुण जन्मजातच आहे, नाहीतर मी म्हणेन दारूच्या निर्मात्यांनी हा गुण नशे सोबत त्यात टाकला आहे असे मला वाटते. कुठल्याही दारूच्या गुत्यात एकच मैत्रीचा झरा, एकतेची भावना आणि प्रचंड लोक-संचय दिसून येतो. दारू कधी एकटी प्यावी असे वाटणारे सुद्धा ‘एकटे’ नसतात, कारण त्याचा सोबत सुद्धा ‘दारू’ नावाची सोबती असतेच. दारू स्वतःच एक खूप मोठ्या व्यक्तींचा संचय आहे असे मला वाटते. दारू न पिणारा व्यक्ती आयुष्य कितीही मोठा झाला तरी शेवटी एकटाच असतो.
विस्की
हे “वय” दाखवण्याचे सुद्धा एक मध्यम आहे, आणि यातून आर्थिक परीस्थिती सुद्धा दिसते. विस्की पिणारा कदाचितच गरीब असतो, विस्की पिणारा सर्वसाधारण ४० च्या पुढचा आणि भर-भक्कम आर्थिक स्थिती असलेला असतो. आयुष्याचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर भूतकाळा बदल आणि भविष्या बदल बोलण्याकरिता किंवा चर्चा सत्र घडवण्यासाठी विस्की जरुरीची असते. ‘मीपणा, उध्दटपणा’ विस्कीमुळे जडतात असे वाटते. विस्की मुळे लोक-संचय तसा कमीच होतो, कारण आर्थिक व वयाची बाजू भक्कम असणारेच हिच्या फंद्यात पडतात.

रम
“रम” असताना कसला “गम” हीच खासियत, रक्तवर्णीयता हेच रमचे वैशिष्ट्य. रम पिणारे खरच पट्टीचे पिणारे असतात. आपल्या दु:खाला मार्ग मिळवून देण्याकरिता रम सारखा पर्याय नाही. रम आपलेसे करणाऱ्यापैकी पेय आहे, पण रम आपली आपणच प्यायची असते. रम पिणार्यांना वयोगट नसतो तर त्यांना अनुभव व शोषितपणा लागतो. रम पिणार्यांची सहनशीलता अपार असते. सहनशीलता हाच रम चा गुणधर्म आहे. आर्थिक दृष्टया तुम्ही सक्षम असाल-नसाल तरी रम तुम्हाला आपलसं करते.
स्काँच
श्रीमंतीचे लक्षण असलेले हे पेय आहे. हे पिताना पिल्यासारखे वाटत नाही आणि उतरल्यावर चढल्या सारखे वाटत नाही. फुकटचा काजूचा खर्च शेंगदाणे चालत नाहीत. लोक जोडण्याचे काम कमीच करते कारण ही पिताना दोघेच असतात एक म्हणजे तुम्ही आणि दुसरे स्काँच. हिचे सुद्धा विशीष्ट वयोमान आहे म्हणजेच ४० च्या पुढे, पण व्यक्त होण्याचे % कमीच. स्काँच पिल्यावर माणूस व्यक्त होतच नाही हे विशेष.
व्होडका
बायकोला घाबरून पिण्याचे साधन.
बियर
चैतन्याचा झरा, चिरतरुण तारुण्य, बेफिकरी आणि विद्रोह हे घटक मिळूनच बियर बनते. हे तरुणांचे पेय आहे आणि फक्त तरुणांनीच प्यावे मग ते वयाने असो किंवा मनाने असो. कुठल्याही मदिरालयात पहा दोन-तीन टेबल जोडून जर एखादी तरुणांची टोळी बसली असेल तर ते फक्त आणि फक्त बियर पीत असतात. माणसे व मित्र जोडण्याचे काम अव्यक्त पणे बियर करत आसते. बियर नुसते पेय नसून ते एक बंधन असते तिघातले- तुम्ही, तुमचा मित्र आणि बियर. एक तीळ ज्याप्रमाणे सात जणांनी वाटून खावा त्याप्रमाणे बियर सुद्धा कमीत-कमी सातजण एकत्रित पिऊ शकतात. बियर बेफिकरी शिकवते, तारुण्याचे टँनिक बियर असते, विद्रोहाचे मध्यम बियर असते, मनातील प्रेम व्यक्त बियर मुळेच होते, मैत्रीचे कारण बियर असते.

विराज वि देवडीकर     

Thursday, 5 January 2017

शिक्षण म्हणजे स्वतःची प्रतिभा ओळखून त्याची साधना...!!!

मी माझ्या मुली करता सध्या शाळा हुडकत आहे, तसे ऐकाला योग्य वाटणार नाही पण शाळा हुडकत नसतात तर शाळा निवडत असतात (ही माझी धारणा आहे). तसे आजची परिस्थिती व शिक्षणाचा बाजार पाहता हुडकणेच योग्य शब्द वाटतो. तसा मी या मोहिमेवर मागील दोन महिन्यापासून आहे. अमुक एक फ्लोवेर, तमुक एक ट्री किंवा आश्रम, गुरुकुल आशी नावे असणारी व Industry म्हणून घेणारी आशी School नावाची Factory ला आठवड्यातून ३ या प्रमाणे मी भेट देत आहे, कधी ambiance अवडला नाही तर कधी teachers चे pronunciation बरोबर नव्हते, तर कधी फीस परवडणारी नव्हती. म्हणजे एकूण काय माझ्या समोरील प्रश्न सुटण्या पेक्षा जास्त गडध होताना दिसत आहे. बर अभ्यासक्रम तर वेगळाच cbsc, icse, igcse, state board इत्यादी, भाषा विषय किती, गणित कोणते वैदिक की आणखी काही, इतिहास कुठला, भूगोल कोणाचा, आणि विज्ञान कशाचे हे सुद्धा समजण्या पलीकडचे. बाकी संगीत, क्रीडा, नाट्य आणि नृत्य हे वयाच्या ३ वर्षा पासूनच म्हणजे एवढा अभ्यास करता करताच त्या फुलांनी कोमेजुनच जायचे. स्वतःचे आशे काही निर्माण करण्याची क्षमताच त्यांच्यातून नष्ट होणार आहे असे दिसते, फक्त “टक्केवारीची भरती” एका school ने तर माझाच Interview घेतला माझी तीन महिन्याची salary slip आणी घरात राहणार्याचे  NOC येवड्या KYC वर मला शाळेबदल माहिती दिली, जसे काही मलाच admission  घ्यायचे होते. एका School मध्ये मला CRO(Customer relation officer) ने मला त्याचे School कसे optimistic असून बाकीचे कसे orthodox आहेत हे पटून दिले. एकूण काय तर दिलेले target  achieve करण्याकरिता चालेली धडपड. अर्थात यात त्या CRO ची काही चूक आहे असे मला वाटत नाही किंवा त्या शाळेची.

कारण शिक्षणाची Industry झाल्यावर हे असेच होणार, जे व्रत म्हणून आयुष्यभर जपावे, तपस्या म्हणून आयुष्य यती बनून राहावे असे शिक्षण आज पूर्ण बदलले आहे. शिक्षण कसे अभिनव पद्धतिने घेता येऊ शकते याबद्दल एक ही जन बोलायला तयार नाही. शिक्षणाची Traditional म्हणवली गेलेली पद्धत केव्हाच गेली पण आता जी आहे ती सुद्धा फार Innovative आहे असे वाटत नाही. “शिक्षण म्हणजे स्वतःची प्रतिभा ओळखून त्याची साधना करणे” असे मला वाटते पण त्या नाजूक कळ्याना त्यांच्या प्रतिभेची ओळख होताना आजच्या शिक्षण पद्धतीतून दिसत नाही, दिसते ते फक्त पालकांच्या इच्छेचे ओझे. याच ओझ्या खाली ते नाजूक विद्यार्थी दबून गेले आहेत.
   Sprouts                                                   विराज                   

Monday, 2 January 2017

#वेळअमावास्या

आज वेळअमावस्या (#येळअमावस्या) आहे, मराठवाड्यातील ग्रामीण भागातील एक वैशिष्ट पूर्ण उत्सव. आजचा दिवस #उस्मानाबाद, #लातूर आणि #सोलापूर जिल्हातील काही भागात एक वेगळा पण शेतीशी नाळ जोडणारा हा उत्सव साजरा केला जातो. येळअमावस्या एक प्रकारे कृतज्ञ: सोहळा आसतो शेती बद्दलचा. शेतकरी आपल्या जवळचे नातलग-मित्रपरिवार घेऊन त्याच्या शेतात ग्रामीण संमेलन साजरे करत आसतो. #पारंपारिक_वेशभूषा, #लोककला, आणी #ग्रामीण जेवणाचा आनंद लुटत आसतो. ज्यातून तो गेल्या सहा महिन्यातील त्याच्या कष्टाचे प्रदर्शन तर मांडतोच पण यातून कृषी पर्यटनाला सुद्धा वाव मिळतो, #ग्रामीण_अर्थव्यवस्थेला चालना मिळते.

शेतकरी मित्र परिवारसहित शेतात पूजा करतो, नंतर शेतात बनवलेल्या भोजनाचा पारंपारिक पद्धतीने आस्वाद घेतो, रान मेव्याचा आनंद लुटतो. आशा या ग्रामीण उत्सवाला(#Rural_Event) जरूर भेट द्या....