Saturday, 15 October 2016

कोजागरी_पोर्णिमा_चारोळी

#कोजागरी_पोर्णिमा #चारोळी
हातात प्याला दुधाचा
श्वासात-श्वास प्रेमाचा
गुणतून चढतो रंग प्रणयाचा
हा धुंद गारवा कोजागिरीचा
...............................................................................
पौर्णिमेच्या प्रकाशात
बघतो मी चंद्राला
चांदण्याच्या सड्यात
निखारतो मी प्रीतीला
...............................................................................
मला जमलेच नाही सांगणे
त्या मुक्त लावण्याला
चोरट्या नजरेने आज सुद्धा
बघतो त्या पौर्णिमेच्या चंद्राला




विराज


Tuesday, 30 August 2016

बैल पोळा आणि मी...!!!

लहानपना पासून बैल पोळा हा दिवस खूप काही आठवणीनी भरलेला आहे, तस बघायला गेल तर माझे घर शेतीवर अवलंबून नसल्यामुळे आणि घराचा आणि शेतीचा प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे म्हणा पण माझा घरी बैल पोळा मातीचे बैल करून साजरा केला जायचा आणि करत आहोत. बैल हा प्राणी कसा शेतीसाठी उपयुक्त आहे व तो शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे हे मी शाळेती निबंधमध्ये लिहून किंवा वक्तृत्व स्पर्ध बोलून मोकळो व्हायचो. घरी मातीचे बैल करून पोळा साजरा करताना पुरण पोळी मात्र स्वतःच खायचो,
मात्र नंतर agriculture ला आल्यानंतर या सणा बदल एक वेगळेच कुतूहल निर्माण झाले, मी मराठवाड्यातील गावात शिकायला असल्यामुळे आणि येथील शेती व्यवसतेत बैलाल असलेल्या महत्वामुळे मला बैला बद्दलच्या आदरात वाढच झाली. खेड्यातील व प्रत्यक्ष शेतकरयाच्या घरी जाऊन बैल पोळा साजरा करण्याचा अनुभव आला. यातून शेतकरी व बैल यांच्या नात्याचा नव्याने उलघडा तर झालाच पण कृतज्ञ भाव हि वाढला. हा छोटाशा उत्सवातून ग्रामीण जीवनाचा आधार दिसला आणि हिंदू संकृतीची प्राणीमात्रा बदल असलेली कृतज्ञत: दिसली. ग्रामीण आर्थ व्यवसतेचा कणा असलेला हा सण, आज जरी वेगवेगळ्या शेती उपकरणामुळे शेती व्यवसतेतील बैलाचे महत्व कमी झाले असले तरी शेतकऱ्याच्या घरातील बैलाचे महत्व व आदर आज हि तसाचा आहे, व तो चिरकाल टिकेल यात शंका नाही.
धन्यवाद 

Sunday, 3 July 2016

अवशेष

हजारो वर्षनंतर जगाच्या उत्खननात माझे कोणते अवशेष सापडतील हे माहित नाही, पण स्वतःचे अवशेष सापडावेत म्हणून प्रत्येक जन धडपडत आसतो. कोणी स्वतःच्या हिंमतीवर जग जिंकायची स्वप्न बघत आसतो, तर कोणी दुसऱ्याला हरवून स्वतःचे आस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आसतो. कोणी स्वतःचे आस्तित्व दाखवण्याकरिता “मुलगा” हा वंशाचा दिवा म्हणून दिवे लावत आसतो, तर कोणी न बोलता खूप काही काही लिहून ज्ञान ज्योती पाजळत आसतो. मात्र सर्वाचे उद्दिष्ट एकच असते ते म्हणजे माझे स्वतःचे “अवशेष”.

कधी-कधी आसे वाटत राहते की, हडप्पा-मोहिंदजडो किंवा सिंधू संस्कृतीचे जणू काही स्वतःचे आस्तित्व दाखवण्यासाठीच “अवशेष” जपून ठेवले. खरा तर स्वतःच्या मरण नंतर स्वतःचे आस्तित्व दाखवण्याकरिता थडगे बंधणारी माणसाची जात आहे. आणि त्यातून निर्माण होणारा स्वतःचा स्वतःशीच असलेला संघर्ष, कारण टीकवायचे आहे ते स्वतःचे आस्तित्व. चुकूनही आपल्या हातून काही घडले आणि ज्यातून आपल्या अस्तित्वाबदल प्रश्न निर्माण व्हायला नको म्हणून मग हा संघर्ष हि नको, आहे तसे राहू द्यायचे.

कदाचित मानवाने नाते-संबंध सुद्धा त्याकरिता निर्माण केले असणार, “हा माझा मुलगा, तो माझा आमुक, ती माझी तमुक” आसे सांगून माणूस आपले आस्तित्व दाखवत आसतो आणि अवशेष जपत आसतो. मानवास स्वतःच्या अवशेषाचा लोभ थोडा जास्तच आसतो. मानव जोपर्यंत जगतो तो पर्यंत तो आस्तित्व जपतो आणि स्वतःच्या मृत्यूनंतर ते त्याच्या येणाऱ्या पिढ्यांनी जपावा आशी अभिलाषा मनी धरतो.
कुठल्याशा एका देशीच्या राजाने म्हणे स्वतःचे थडगे मरणा पूर्वीच बांधून ठेवले होते, ते इतके भव्य-दिव्य होते की जणूकाही महालच, ते सर्व सुख-सोयीनी युक्त होते. त्याद्वारे राजाने स्वतःचे अवशेष येणाऱ्या पिढ्यांना दिले. पण त्याच्या मरणा नंतर काही वर्षातच ते थडगे रुपी महाल चोर लुटारुचे ठिकाण बनले व त्यातील संपत्तीचा उपभोग चोरांनी घेतला. आर्थत यातून राजाचे इच्छित साध्य झालेच नाही. पण आपण आज येथे त्याच्या वेडपटपणा बद्दल बोलत आहोत हे सुद्धा एक प्रकारे त्याचे अवशेष जपण्यसारखेच आहे ना???

Sprouts… 

Sunday, 5 June 2016

बदलांचे विचार...!!!

नवीन विचारांची मांडणी करताना काही वेळा वेगळा विचार करणे गरजेचे वाटते, कुठलाही बदल सहज घडत नसतो, तो घडवण्यासाठी विचारांची आणि कष्टांची धडपड लागते. मागील काही दिवसापासून मनात बदलाचे वारे वाहत आहे, आणि विशेष म्हणजे नवीन बदलाचे. ठरलेल्या पठडीत दिवस घालवण्यास विशष उत्साह दिसून येत नाही, किंवा गेलेल्या दिवसाकडून संध्याकाळी काही मागायचे म्हटले तर देण्यासारखे काही उरत नाही. बदल सहजा-सहजी मनात रुजत नसतो. खूप व्यतेय येतात, खूप अडचणी असतात. कदाचित मनाला तो बदल मनातून आवडलेले नसतो, कारण मन हे भावनिक गुंत्यात जास्त रमते व तशीच सवय शरीराला लागते आणि त्यामुळेच बदल शरीराला झेपत नसतील. मात्र एकदा बदल घडला तर सुरवातीला त्रास होतो नंतर पुन्हा हे मन पहिल्या सारखे नवीन बदलात ही गुंतते.
कशात तरी गुंतून राहणे हा कदाचीत मनाचा स्वभाव असावा किंवा त्याला ते आवडत आसवे पण गुंतलेल्या विश्वातून सोडून न घेता दुसऱ्या गुंत्यात गुंतणे हे मनाचे नसते उद्योग असतात. लहान बाळा प्रमाणे दोन्ही हातातील दोन्ही गोष्टी न सोडणे हे मनालाच शोभते. म्हणूनच आस वाटत आला की काही बदल हवा आहे ज्यातून मनास काही विरंगुळा मिळायला हवा व नवीन गुंता-गुंती घडायास हव्यात.  


Sprouts…