Sunday, 25 March 2018

राम जन्मोत्सव

#जय_श्रीराम

आज सकाळी तेर जिल्हा उस्मानाबाद येथल्या श्रीराम मंदिरातील रामाचे दर्शन झाले,अत्यन्त प्रसन्न पण तेवढीच तेजस्वी मूर्ती असे श्रीरामाचे दर्शन. गावाकडची राम नवमी असल्यामूळे वातावरण कसे उत्साही असते. राम नवमी आणि राम जन्मोत्सव कार्यक्रमा तसा नवीन नाही गाव कडे म्हणजे उस्मानाबादला असतांना शहरातील वेगवेगळ्या मंदिरात साजरा होत असलेल्या राम जन्मसोहळ्या उपस्थित राहायचो, पुण्यात आल्यापासून अशा सगळ्या सोहळ्यानं मुकलो आहे. पण त्यावेळी काही वेगळीच मज्जा असायची. आम्ही घरचे सर्व समर्थ नगर मधील राम मंदिरात राम नवमी करीता जायचो, चैत्राचा महिना असल्यामुळे उष्ण वातावरण तर असायचेच तर आंब्याला आलेल्या कैऱ्यांचा वास दरवळत असायचा, थंडगार कैरीच्या पन्ह्या ची आंबट गोडं चव अजूनही जिभेवर तरळती आहेच. घरात आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे सार्वजनिक उत्सवात हीरीरीने सहभाग घ्यावा लागत असे मग राम नवमी असेल किंवा कृष्णाअष्टमी असेल, त्या त्या मंदिरात, धार्मिक स्थळी जाऊन सेवा करावीच लागत असे, त्यामुळे समाजात वावरण्याची शिकवण मिळते. वेगवेगळ्या जवाबदाऱ्या घेऊन सामाजिक काम करण्याची संधी मिळत असे, अशा उत्सवात कधी मंदिर साफ सफाईची जवाबदारी असे तर कधी मंदिर सजावटीची कामे असत. कधी महाप्रसादा ची व्यवस्था असे तर कधी जेवणावळी वाढण्याच्या कामात असत. वेगवेगळ्या व्यवस्था असत ज्यात सेवा कार्य चालत असे, अशा जवाबदाऱ्या घेऊन सर्वांनी मिळून तो उत्सव यशस्वी होईल या करिता प्रयत्न करत असत

अशा वातावरणात बालपणा पासून राम कृष्णांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो, आता काल्पनिक वाटणाऱ्या या चरित्राचा मना वरती खूप मोठा बडगा आहे, आज सुद्धा प्रामाणिकपणा नीतीमूल्य याचा वस्तुपाठ म्हणून श्रीराम चरित्रा कडे पहिले जाते. जे आस्तिक आहेत त्यांना तर राम मान्यच आहे पण नास्तिकांच्या सुद्धा विचारात राम आहे हे जाणवून जाते. एखाद्या चरित्राच्या अस्तित्त्वा करीत आवश्यक असलेले वस्तुनिष्ठ पुरावे या दोन्ही चरित्राकरीत आज उपलब्ध नसतील ही पण यांच्या कल्पनात्मक चरित्रातून समाज निर्माण करण्याची शक्ती आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. श्रीराम मना मनात रुजवायचे म्हणजे मनातील विघटनकारी रावणाचा विनाश करणे होय, तर आणि तरच एक समाज एक राष्ट्र निर्माण होऊ शकते, कदाचित राम राज्य ही हेच असेल. श्रीराम-कृष्ण या दोघंच्या ही चरित्र करणी ही शिकवण मोठ्या खुबीने मंडळी आहे. श्रीराम चरित्र हे समाज घडवण्याचे खूप मोठं साधन आहे असे मला वाटते, आणि चरित्रवन समाजच कल्याण करी समाज असू शकतो असे मला वाटते. अशाच कल्याणकारी समाजाची प्रभू श्रीरामचंद्रा कडे अपेक्षा करू आणि रघुनाथास विनम्र अभिवादन करूयात

जय श्रीराम

Wednesday, 7 March 2018

पुतळ्याचे आत्मवृत्त

राणीच्या बागेत किंवा कुठल्याशा पार्कात मध्यभागी पडून असलेला मी, म्हणाल तर निर्जीव पण सजीवात प्राण फुकण्याची क्षमता असलेला मी, तस या "मी" ला नाव सुद्धा आहे पण नाव आलं की जात येते, जात आली की धर्म येतो, धर्म आला की भाषा येते आणि हे तिघे आले की या तिघांची मिळून अस्मिता येते म्हणून नको आज नाव नकोच. नाव घेतला की मग बोलताना सुद्धा अडचण येते. कारण तेथून पुढच्या प्रत्येक शब्दात या तीन गोष्टी शोधल्या जातात, म्हणून आज फक्त पुतळा. तस फार काही माझं अस्तित्व नसत म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने मला बसवलंजात त्याचच काय ते अस्तित्व असत मी नाम मात्र असतो. काही जण म्हणतात मी त्यांच्या करता प्रेरक असतो, पण ते मला नाही खरं वाटत. 

बाकी आमचा सुद्धा खूप मोठा समाज आहे बरं का !! जेवढे समाजात व्यक्ती(माणसं) तेवढे पुतळे, एका माणसाचा एक असं काहीस असत. कधी आम्ही रस्त्याच्या मधो-मध असतेत तर कधी रस्त्यावर कोपऱ्यात असतेत, कधी पार्कात असतेत तर कधी ऐतिहासिक वस्तू मध्ये असतेत, कधी कोणाच्या समाधीवर असतेत तर कधी इस्पितळात असतेत, एकूण म्हणजे आमचे असण्याचे ठिकाण खूप आहेत असं एक विशिष्ट ठिकाण नाहीच हो! सर्वत्र आम्ही आहोत. आमचा वर्ण सुद्धा आहे बरं का !! म्हणजे काही पुतळे हे काळ्या पाषाणातले असतात आणि खूप ओबडधोबड असतात असे खालच्या वर्गातले पुतळे आहेत तर काही मेणा पासून बनवलेले पुतळे आहेत ते फार नाजूक असतात ते तर AC शिवाय कुठे राहातच नाहीत. बाकी बहुतेक पंच धातुचे असतात माझा सारखे. काही सोनं-चांदीचे ही असतात पण ते तिकडं फॉरेनात आपल्या इकडं नाही. काही पुतळे पूर्णाकृती असतात, काही कमरे पर्यंत असतात तर काही छाती पर्यंत असतात. खरं तर पुतळ्याला सुद्धा बजेट असते  आमच्यात, जस बजेट तसा पुतळा. काही श्रीमंत पुतळे असतात तर काही गरीब पुतळे असतात. राजकीय भाषेत बोलायचं तर काही कॅप्टलिस्ट असतात तर काही कम्युनिस्ट असतात. 

तस आम्ही समाजतले निरुपयोगीच जो व्यक्ती हयात नाही त्याची आकृती म्हणून आम्ही समाजात वावरत असतेत. आम्ही कोणाला बोलू शकत नाहीत आणि ऐकायचं म्हणाल तर आम्हाला ऐकू येत, मी तर खूप मज्जा घेऊन ऐकतो कोणाला बोलू नका हं !! पण चोरून ऐकण्यात वेगळीच मज्जा असते. जे रस्त्यावरती असतात ना त्यांना गाडीच्या भोंग्या शिवाय काही ऐकू येत नाही पण माझ्या सारख एखाद्या बगीच्या मध्ये असणाऱ्यांची मज्जच काही और असते. माझा पाप-पुण्यावर विश्वास यामुळेच आहे, कारण मागच्या जन्मी मी खरंच काही पुण्य केलं असेल म्हणून मी पुतळा बनून बगिच्यात आलो. बगिच्यात असल्यामुळे गुलु-गुलु बोलणं  ऐकण्याच्या खूप संधी येतात, मज्जा असते दोन प्रेमी युगलकांचे संवाद ऐकण्याची, कधी रुसवे फुगवे असतात तर कधी भांडण असतात. माझाच खाली पायरी वरती येऊन दोघेही बोलत बसतात. कधी नवं विवाहित असतात तर कधी वृद्ध असता पण संवाद मात्र सुख-दुःखाचाच असतो. ते दोघे बोलताना एकमेकांच्या मनातला बोलत असतात पण न कळत ते माझा ही मनात घर करून बसतात.

आमच्या पैकी बहुतेक पुतळे सुखी असतात, पण बगिचातल्या पुतळ्याचं दुःख फक्त चिमण्या कावळ्या मुळेच असते. खरे दुखी रस्त्यावरचे पुतळे असतात  धूळ धूर गाड्यांच्या भोंग्याचा आवाज हे तर त्यांच्या दुःखाचे कारण आहेच पण त्यांचे अनुयायी सुद्धा खूप दुःख देतात बिचार्यांना. हार-तुरे मान-सन्मान खूप मिळते पण उन्हाचे चटके ही खूप सोसावे लागतात. पावसाचे पाणी आणि थंडित हवा सुद्धा खूप झोंबते. अनुयायांचे प्रेम आणि विरोधकांची टीका हे त्या व्यक्तीमुळे असते पण भोगावे पुतळ्याला लागते आणि हेच त्याचे वर्तमान असते.  

असो पुतळा होण्याचं एकच खूप मोठं दुःख आहे, आयुष्य ज्या माणसाने अन्याया विरुद्ध लढण्यात घालवले तोच मृत्यू नंतर डोळ्या समोर अन्याय होत असताना पुतळा बनून उभा असतो. 

धन्यवाद    

(टीप: कृपया हे लक्षात घ्यावे की हे पडक्या पुतळ्याचे आत्मवृत्त नाही फक्त पुतळ्याचे आत्मवृत्त आहे)