Monday, 19 April 2021

#वर्षाचा_दिवस १०९ वा, Motivational Speeches च मार्केट

 वर्षाचा दिवस १०९ वा, लॉकडाउन २.० चालू आहे, त्यामुळे बरेच लोक घरून काम करता आहेत किंवा अनेकांना कामच नाही. त्यामुळे घरात बसून रिकाम्या वेळेत काय करायचे हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आहे. मागील वर्षी सुद्धा अशीच परिस्थिती होती, मागील वर्षी करोनाची अज्ञात भीती होती या वर्षी त्यात प्रचंड बदल झाला आहे आणि त्यामुळे अति परिचयात अवाज्ञा अशी काहीशी स्थिती करोना विषयी आहे. मात्र या दोन्ही लॉक डाउन मधील साम्य म्हणजे "रिकाम्या वेळेचा सदुपयोग" कसा करायचा ? ही एक समस्या निर्माण झाली आहे. मागील लॉकडाउन मध्ये लोकांना सुट्टीचे आकर्षण होते, अचानक मिळालेल्या सुट्टीचा आनंद काही दिवस तरी लोकांनी घेतला पण नंतर हीच समस्या त्यावेळी सुद्धा निर्माण झाली होती. लॉक डाउन काळात पुस्तक वाचन(झेपेल त्याने केले), सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म वरच्या वेब सिरीज याच बरोबर अजून एक कन्टेन्ट प्रकार लोकांना प्रचंड प्रभावित करून गेला तो म्हणजे "Motivational Speeches", या काळात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या माध्यमातून प्रेरणात्मक भाषणे पहिली गेली. youtube, facebook, instgram या माध्यमाद्वारे Motivational Speeches पाहणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.


लॉक डाउन १ किंवा २ मध्ये सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर नैराश्य आणि नकारात्मक विचार या प्रकारच्या मानसिक समस्येने ग्रासले आहेत. त्याकरिता अनेक करणे आहे, त्यापैकी थांबलेले आर्थिक चक्र,  इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातून येणाऱ्या नकारत्मक बातम्या हे दोन महत्वाचे करणे या मानसिक समस्ये मागे आहेत व त्यामुळे  नकारात्म विचारांची मांडणी होत आहे, या सर्वा वरील उपाय म्हणून "Motivational Speeches" या कन्टेन्ट कडे सामान्य माणूस वळला असे म्हणता येईल. करोना पूर्वीच्या काळात सुद्धा "Motivational Speeches" पाहणाऱ्यांची किंवा ऐकणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती मात्र करोना नंतर च्या काळात यात वाढ झालेली दिसते. या प्रकारच्या भाषणातून सामान्य माणूस कुठे तरी आधार हुड्कातना दिसतो.

नेमके काय या "Motivational Speeches" मध्ये असते?

सामान्यपणे वक्ता या प्रकारच्या भाषणात स्वतःची success story किंवा कोणत्यातरी नायकाची कथा कथन करत असतो. यात नक्कीच वक्त्याचे  संवाद कौशल्य तर असते पण श्रोता त्या कथेशी स्वतःच्या संबंध (correlate) जोडत असतो. कुठेतरी कथेतील नायक सामान्य मनुष्याप्रमाणे समाजातील असंख्य समस्यांशी झगडत यशस्वी होतो व त्यातून सामान्य माणसाच्या मनात विश्वास निर्माण होत असतो. श्रोत्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण होतो व सकारात्मक वातावरण वाढीस लागते.


Motivational Speeches
या पूर्वी मोठ्या प्रमाणावर व्याख्यानमालेत व्हायचे पण करोना काळात एकत्रीकरण बंद असल्यामुळे हे भाषण सोशल मीडियातून किंवा digital platform वरून प्रसारित व्हायला लागली आहेत. अनेक प्रसिद्ध वक्ते या माध्यमांचा वापर करत श्रोत्यांशी संवाद साधत आहेत. नवीन व्यवसायाचे माध्यम म्हणून "Motivational Speeches" कडे पहाता येऊ शकते. अनेक वक्ते तर या लॉक डाउन काळामध्ये जन्मलेले आपल्याला दिसतील. आपले वक्तृत्व जेवढे फडे व लोकांशी नाळ जोडणारे तेवढी आपली viewership जास्त व लोकं पर्यंत ची पोहंच(Reach) सुद्धा जास्त. भाषणाच्या viewership आणि reach हेच वक्त्याचे आर्थिक लाभाचे स्त्रोत आहेत. या विषयीची अधिकची माहिती डिजिटल मीडियाच्या अभ्यासातून मिळू शकते.

Motivational Speeches मधून खरंच फायदा होतो का?

काही प्रमाणात नक्की फायदा होतो. विशेष करून जेव्हा नकारात्मक वातावरण मोठ्या प्रमाणावर भरलेले असते तेव्हा "बुडत्याला काडीचा आधार" त्याप्रमाणे या भाषणांचा फायदा होतो. पण या भाषणात स्वप्नरंजण जास्त असते. नायकांच्या यशोगाथा सांगताना कष्ट आणि समस्या यांचे मूल्य कमी केलेले असते. स्पष्टच सांगायचे म्हणजे, फक्त ही भाषणे ऐकून यशस्वी झालेला कोणीही नाही. पण या प्रकारची भाषणे देणारे वक्ते मात्र नक्की प्रसिद्ध झाले आणि त्यांनी पैसा सुद्धा या द्वारे कमावला. एखाद्याची यशोगाथा ऐकण्यात-वाचण्यात काहीच गैर नाही पण त्यातून फक्त प्रेरणाच मिळते, स्वप्नपूर्ती करिताचे कष्ट स्वतःलाच करावे, समस्यांशी झगडावे स्वतःला लागते, उत्तरे स्वतः हुडकावी लागतात, मार्ग स्वतः काढावे लागतात. कथा किंवा यशोगाथा फक्त रम्य असतात. 

 

धन्यवाद

 

विराज वि देवडीकर

 

थ्रेड मराठी