तात्यारावांच्या जीवनाचा अभ्यास करताना हे जाणवते ते म्हणजे, "राष्ट्र" हा जीवनाचा गाभा मानून त्याभवती आपल्या प्रतिभेच्या सर्व क्षेत्रातील तपस्येतुन जीवन पुष्प अर्पण करणे म्हणजे #स्वातंत्र्यवीर_विनायक_दामोदर_सावरकर. १८९८ साली #चाफेकर_बंधू ना फाशी देण्यात आली त्या रात्री भंगुर मधील स्वगृही कुलस्वामिनी समोर घेतलेल्या प्रतिज्ञे पासून," देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मी मारता मारता मरेतो झुंजेन!" सुरु झालेला हा स्वातंत्र्य यज्ञ आणि त्यात दिलेल्या आयुष्यातील एका एका आहुती मुळे हा #स्वातंत्र्यऋषी आ चंद्र-सूर्य अमर झाला आहे. प्रचंड प्रतिभा लाभलेला विलाक्षन बुद्धिमत्ता असलेला बंडखोर विद्यार्थी, अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेचा नेता आणि कुशल संघटक, #१८५७चा_स्वातंत्र्यसमर लिहणारे इतिहासकार, ब्रिटिशांना त्यांचाच देशात सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक, ५० वर्षाच्या दोन काळ्या पाण्याच्या शिक्षेला पुरून उरलेला मृत्युंजय, रत्नागिरीस स्थानबद्ध असताना समाजसुधारण्याची चळवळ करणारा कर्ता समाजसुधारक, अलौकिक वक्तृत्वाचे धनी, मराठीभाषेचे शुद्धीकारण करणारे भाषाप्रभु, रत्नागिरीस अस्पृश्याच्या हातून मंदिरातील देवाची स्थापना करणारा जात्युच्छेदक, विज्ञाननिष्ठ आणि विवेकनिष्ठ हिंदू समाजाची निर्मिती करणारा कार्यकर्ता, अजरामर काव्य संपदा असणारा कवी, उत्कृष्ट लेखक आणि नाटककार. या सर्व प्रतिभा असून सुद्धा फक्त मातृभूमीचा भारतमातेचा सुपुत्र म्हनून घेणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. त्यांच्याच काव्य पंक्ती प्रमाणे," गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा !" सर्वकाही मातृभूमी करीत अर्पण करणे हेच व्रत तात्याराव यांनी जन्मभर पाळले,"तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण". पण जन्मभर आणि मृत्यूंनंतर सुद्धा प्रचंड अवहेलनाच मिळाली त्यांना. या तेजस्वी स्वातंत्र्य यज्ञा भवती इचकत वाचकत तोंड करून नाचणारे माकडं आज सुद्धा दिसतात. तरी ही अधर्माच्या महासागरातील दीपस्तंभा प्रमाणे अढळ स्थान निर्माण केलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची आज १३५वी जयंती त्या निमित्याने विनम्र अभिवादन.
©विराज