#हिंदू_साम्राज्य_दिन #शिवराज्याभिषेक_दिन
#वर्षाचा_दिवस_१७४वा, आज हिंदू साम्राज्य दिन याच दिवशी रायगडावर शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार झाले, हिंदू कालगणने नुसार तो दिवस होता "ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६" या दिवशी रायगडावर पहाटे राज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली, पहाटेच्या मुहूर्ता वर राजांना पवित्र अशा सप्तनद्यांच्या पाण्यानी आणि पंचामृताने आभिषेक घालण्यात आला. उच्चं स्वरातील मंत्रोच्चार आणि कुलदेवता आई तुळजा भवानी च्या स्मरणाने राज्यभिषेकाला सुरवात झाली. पवित्र नद्या आणि पंचामृताचा अभिषेका नंतर राजांनी ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचे पूजन केले व त्यावर ते विराजित झाले, राजे सिंहासनाधीश झाले. त्यानंतर कशी वरून आलेल्या पंडित गागाभट्टानी राज्यांच्या डोक्यावर छत्र धरले, शिवाजी राजे छत्रपती झाले, या तीन वेगवेगळे पण एकत्रित संस्कारातुन शिवराय अभिषिक्त झाले. त्यानंतर शिवाजी राजांचा आणि हिंदवी स्वराज्याचा एकच जयघोष रायगडावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरे नुसार ३२ विविध शुभ शकुनांनी सजवलेले होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हिंदू परंपरे नुसार तर झालाच पण त्यामुळे हे स्वराज्य संस्कारित झाले व ते प्रस्तापित सुद्धा झाले.
परकीय
आक्रमकांच्या टाचा खाली चिरडलेल्या गेलेय आपल्या माय भूमीची सुटका छत्रपती शिवाजी
महाराजांच्या राज्याभिषेकाने झाली, मना
मनावरती जमलेला पारतंत्र्याचा गंज शिवाजी राजांच्या राज्यभिषेकाने धुऊन निघाला.
सामान्य जनतेचे स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले. पारतंत्र्यात खितपत पडलेली
प्रजा, अस्मिता हरवून बसलेला समाज आणि बंदिवासात कोंडले गेलेले देव छत्रपती
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका मुळे मुक्त झाले. या हिंदवी स्वराज्याने पाच
शाह्या आणि मुघल यांच्या विरुद्ध बंड करण्याची ताकत हिंदू समाजात निर्माण केलीच पण
या परकीय आक्रमकांच्या विरुद्ध हिंदूंचे स्वतंत्र साम्राज्य निर्माण केले.
त्यामुळे हा दिवस हिंदू साम्राज्य दिन बनला.
छत्रपती
शिवाजी महाराज कि जय
जय
भवानी जय शिवाजी
वंदे
मातरम
