Tuesday, 25 December 2018

शब्दप्रभू : अटल जी



इतिहासात असे दोन पंतप्रधान आपल्याला दिसून येतात जे त्यांच्या समकालीन राजकारणात एकमेव अद्वितिय बनले ते त्याच्या जवळ असलेल्या अलौकिक वक्तुत्वा मुळे, राजकारणांत कसलीही पार्श्ववभूमी नसताना फक्त आणि फक्त आपल्या वक्तृत्व क्षमतेवर विश्वास ठेऊन आणि त्याच भांडवलावर त्या त्या महान देशांची सर्वोच्च पद भूषवले. ब्रिटन सारख्या त्या वेळच्या महासत्तेचे प्रमुख आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटन ला पराभवाच्या छायेतून बाहेर काढणारे विनस्टर्न चर्चिल आणि दुसरे श्रध्देय अटल जी. वक्तृत्व ही एक कला आहे पण या कलेचा जन माणसावर प्रचंड प्रभाव दिसून येतो. वक्तृत्वातूनच मृतांच्या देशाला जागवत येते हे आपण स्वतंत्र युद्धाच्या वेळी बघितलंच आहे. वक्तुत्व हे अटल जीना लाभलेली अशी संजीवनी होती ज्यमुळे त्यांनी असंख्य युवा मनानं जागृत केलं व राष्ट्र कार्य करिता प्रेरित केलं. स्वातंत्रवीर सावरकरांच्या काव्य पंगती प्रमाणे, "गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा" त्याप्रमाणेच अटल जी आयुष्यभर भारत मातेच्या सेवे करीत त्याच्या या कलेची जोपासना करात राहिले, आणि त्याच्या वक्तृत्वाचा सुगंध भारत मातेच्या सुपुत्राने प्रेरित करत राहिला.
त्यांच्या भाषणाची खूप वैशिष्ट्ये सांगता येतील, भाषे वर असणारे प्रभुत्व तर आहे, शब्दांची मांडणी आहे. दोन वाक्य मधील अंतर आहे (पॉज). डोळ्यातून श्रोत्यांशी जोडलेले नाते आहे. आवाजात असलेली गंभीरता आणि त्यामुळे चेहऱ्यावर दिसणारा दृढ निश्चय. या अशा त्यांच्या जमेच्या बाजू होत्या आणि त्यामुळे श्रोता खेळून रहात असे. त्याच्या भाषणातून वक्ता आणि श्रोता यांच्यात एक नाते निर्माण झालेले दिसते. एक दृढ निश्चय त्याच्या शब्दा शब्दातून जाणवायचा जो या भारत भूमीला बलशाली बनवण्यासाठी संकल्पित होता.

त्यांच्या भाषणात विरोधकांना वर टीका केलेली असे पण ती टीका कधी बोचणारी नसे, विरोधकांना सुद्धा ती टीका आपलेशी वाटे. अटल जी स्वतःच्या शब्दांचे मूल्य जाणत होते, त्यामुळे त्यांचे महत्व त्यांनी होते. त्यामुळेच इंदिरा गांधींना "दुर्गा" कधीही म्हटले नाही या मतावर ते ठाम होते तसेच पं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना "भावी पंतप्रधान" कधीच म्हटले नाही या वर सुद्धा ठाम होते. दोनीही वाक्यांचा राजकीय लाभ त्यानं चांगला घेता आला असता पण त्यांनी ते टाळले.
 शब्दांच्या माध्यमातून त्यानी मन-मनात निर्माण केलेला विश्वास त्यानं या देशाच्या सर्वोच्च पंतप्रधाना पैकी एक बनून जातो. माझ्या सारख्या अती सामान्य व नवोन्मुख वक्त्यास त्यांचे वक्तृत्व सदैव प्रेरणादायी व अभ्यासनीय राहिले आहे. त्यांच्याच शब्दात शेवट करताना त्याच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन

“हार नही मानूगा, रार नही ठानुगा,
कल के कपाल पर लिखता, मिटाता हूँ|
गीत नया गाता हूँ|”

वंदे मातरम                                                                                                    विराज                                                                                                 

Monday, 24 December 2018

हेमंतशिबीर


आज संघ शिबीर भेट देण्याचा योग्य आला, पुण्यात कोंडव्या जवळ #येवलेवाडी येथे #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघाचे #हेमंतशिबीर(बाल विभाग) सध्या सुरू आहे २२ ते २५ डिसंबर २०१८, व्यवस्थे मध्ये स्वच्छता विभागात कार्यकर्ता म्हणून काम केले त्या निमित्याने हेमंत शिबिराला भेट देता आली. मागच्या चार पाच वर्षात पुण्यात संघ कार्याशी जोडला गेल्या पासून पहिल्यांदाच शिबिराला गेलो होते. लहानपणी धाराशिवला असताना हेमंत शिबिराला जायचो, १८-१९ वर्ष झाली असेल शेवटचे शिबिराला जाऊन, कळंब चे शिबीर ज्याला स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिलो होतो. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडीत होती, मांजरा नदीच्या काठवरती तुडुंब भरलेल्या नदी पात्रा शेजारी शिबिराच्या राहुट्या होत्या. प्रचंड कडाक्याची थंडी रात्री आणि पहाटे च्या वेळी पडलेली असायची, दोन रात्र आणि तीन दिवस हे शिबीर होते, एक वेगळा अनुभव असतो संघ शिबिर. सर्व सदारणपणे हेमंत शिबिर हे नाताळाच्या सुट्ट्याच्या आसपास असते त्याचे एकमेव कारण म्हणजे अत्यंत कठीण अशा कडक थंडीच्या काळात निसर्गाच्या सानिध्यात राहने. हेमंत शिबीर म्हणजे एक वेगळीच मज्जा असते, सकाळी पाच च्या नादावर उठायचे, प्रातःविधी आटपून संघस्थान वरती जमने मग ध्वजारोहण होऊन प्रातः शाखा लावणे, त्यानंतर चे कार्यक्रम व्यायाम, सूर्यनमस्कार, दंड बैठक, मैदानी खेळ होतात ज्यातून शरीरात ऊर्जा निर्माण होते. मग न्हारी आणि बौद्धिक वर्ग होतात, दुपारी जेवायची सुट्टी विश्रांतीची वेळ असते मग पुन्हा सायं शाखा आणि बौद्धिक वर्ग. रात्रीच्या जेवना नंतर विविध गुण दर्शन कार्यक्रम म्हणजे मनोरंजन सत्र सुरू होते. कुणी कविता म्हणते तर कुणी एक पत्री नाटक सादर करते, कोणी विनोद सांगतो तर कोणी कथेतून राडवतो आणि कोणी शिव कर्तृत्वाचा पोवाडा गातो. जेवढे स्वयंसेवक तेवढ्या अनुभूती, इथे जात-पात, उच्च निच्च, वर्ण आणि कर्म भेद असे काही नसते. इथे सर्वच स्वयंसेवक असतात आणि हे सर्वच समाज बांधव असतात, इथे सगळेच एकमेकांच्या मांडीला मंडी लावून जेवायला बसतात आणि एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून राष्ट्रा करीता उभे राहतात

एक आठवण म्हणून सांगतो,१९३० च्या आसपास हेमंत शिबीर वर्ध्याला . पु. महात्मा गांधी राहत असलेल्या बिर्ला भवनच्या जवळच चालू होते. त्यावेळी महात्मा गांधी तेथेच वास्तव्यास असल्यामुळे शिबीर प्रमुकांनी आदरणीय गांधीजी ना शिबीर भेटीस आमंत्रित करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे संपर्क साधून गांधीजी ना आमंत्रित केले, त्यांनी ही ते स्वीकारले एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी त्यांनी भेट दिले. शिबीर प्रमुख, कार्यवाह इतर पदाधिकारी त्यांच्या सोबत होतेच ते विविध विषयाची माहिती गांधी जी ना देत होते, गांधीजी सुद्धा ही सर्व माहिती उत्सुकतेने ऐकत होती प्रती प्रश्न करत होते. बोलता बोलता ज्यावेळी भोजन कक्षात गांधी जी आले त्यावेळी त्यांनी शिबीर प्रामुख्यानं उद्देशून प्रश्न केला की "या जेवण्याच्या पंगतीत बसलेल्या स्वयंसेवक पैकी किती सवर्ण आहे किती हरिजन आहे??" या प्रश्नाने चकित झालेले शिबीर प्रमुख आदराने उत्तरले जाती वरून संघात विभागणी होत नाही त्यामुळे आम्ही याची नोंद घेतलेली नाही. .पू. गांधी जी या उत्तराने सुखवले. देशाच्या एकात्मतेचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघा कडून घडत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.
जरूर एकदा तरी भेट द्यावी आपल्या जवळच्या हेमंत शिबिराला.

वंदे मातरम।                                                                                                                    ©विराज