माणसे जोडणे आणि विशेष करून मित्र करून जोडणे ही एक कला आसते, काही
लोकांना ती अवगत असते, न्हवे तर ती जन्मजात उपजतच असते, त्या प्रमाणेच काही वस्तू
किंवा गोष्टी असतात त्यांना सुद्धा “ही” कला अवगत आसते. व्यक्ती किंवा व्यक्ती-समूह
त्या वस्तु कडे आपसूकच आकर्षित होत असतात जसे की पत्ते, तंबाखू, चावडी, चहाचा
स्टाँल, आणि त्याच प्रमाणे “दारू”
दारूत हा गुण जन्मजातच आहे, नाहीतर मी म्हणेन दारूच्या निर्मात्यांनी
हा गुण नशे सोबत त्यात टाकला आहे असे मला वाटते. कुठल्याही दारूच्या गुत्यात एकच
मैत्रीचा झरा, एकतेची भावना आणि प्रचंड लोक-संचय दिसून येतो. दारू कधी एकटी प्यावी
असे वाटणारे सुद्धा ‘एकटे’ नसतात, कारण त्याचा सोबत सुद्धा ‘दारू’ नावाची सोबती
असतेच. दारू स्वतःच एक खूप मोठ्या व्यक्तींचा संचय आहे असे मला वाटते. दारू न
पिणारा व्यक्ती आयुष्य कितीही मोठा झाला तरी शेवटी एकटाच असतो.
विस्की
हे “वय” दाखवण्याचे सुद्धा एक मध्यम आहे, आणि यातून आर्थिक परीस्थिती
सुद्धा दिसते. विस्की पिणारा कदाचितच गरीब असतो, विस्की पिणारा सर्वसाधारण ४० च्या
पुढचा आणि भर-भक्कम आर्थिक स्थिती असलेला असतो. आयुष्याचा एक टप्पा पूर्ण झाल्यावर
भूतकाळा बदल आणि भविष्या बदल बोलण्याकरिता किंवा चर्चा सत्र घडवण्यासाठी विस्की
जरुरीची असते. ‘मीपणा, उध्दटपणा’ विस्कीमुळे जडतात असे वाटते. विस्की मुळे लोक-संचय
तसा कमीच होतो, कारण आर्थिक व वयाची बाजू भक्कम असणारेच हिच्या फंद्यात पडतात.
रम
“रम” असताना कसला “गम” हीच खासियत, रक्तवर्णीयता हेच रमचे वैशिष्ट्य.
रम पिणारे खरच पट्टीचे पिणारे असतात. आपल्या दु:खाला मार्ग मिळवून देण्याकरिता रम
सारखा पर्याय नाही. रम आपलेसे करणाऱ्यापैकी पेय आहे, पण रम आपली आपणच प्यायची असते.
रम पिणार्यांना वयोगट नसतो तर त्यांना अनुभव व शोषितपणा लागतो. रम पिणार्यांची
सहनशीलता अपार असते. सहनशीलता हाच रम चा गुणधर्म आहे. आर्थिक दृष्टया तुम्ही सक्षम
असाल-नसाल तरी रम तुम्हाला आपलसं करते.
स्काँच
श्रीमंतीचे लक्षण असलेले हे पेय आहे. हे पिताना पिल्यासारखे वाटत नाही
आणि उतरल्यावर चढल्या सारखे वाटत नाही. फुकटचा काजूचा खर्च शेंगदाणे चालत नाहीत.
लोक जोडण्याचे काम कमीच करते कारण ही पिताना दोघेच असतात एक म्हणजे तुम्ही आणि
दुसरे स्काँच. हिचे सुद्धा विशीष्ट वयोमान आहे म्हणजेच ४० च्या पुढे, पण व्यक्त
होण्याचे % कमीच. स्काँच पिल्यावर माणूस व्यक्त होतच नाही हे विशेष.
व्होडका
बायकोला घाबरून पिण्याचे साधन.
बियर
चैतन्याचा झरा, चिरतरुण तारुण्य, बेफिकरी आणि विद्रोह हे घटक मिळूनच
बियर बनते. हे तरुणांचे पेय आहे आणि फक्त तरुणांनीच प्यावे मग ते वयाने असो किंवा
मनाने असो. कुठल्याही मदिरालयात पहा दोन-तीन टेबल जोडून जर एखादी तरुणांची टोळी
बसली असेल तर ते फक्त आणि फक्त बियर पीत असतात. माणसे व मित्र जोडण्याचे काम
अव्यक्त पणे बियर करत आसते. बियर नुसते पेय नसून ते एक बंधन असते तिघातले- तुम्ही,
तुमचा मित्र आणि बियर. एक तीळ ज्याप्रमाणे सात जणांनी वाटून खावा त्याप्रमाणे बियर
सुद्धा कमीत-कमी सातजण एकत्रित पिऊ शकतात. बियर बेफिकरी शिकवते, तारुण्याचे टँनिक
बियर असते, विद्रोहाचे मध्यम बियर असते, मनातील प्रेम व्यक्त बियर मुळेच होते,
मैत्रीचे कारण बियर असते.
विराज वि देवडीकर
