"वराती मागणं घोड" हा वाक्य प्रचार आम्हाला चफलाक लागू पडतो, सगळं जग ज्यावेळी एखाद्या दिशेला धावत असतं त्यावेळी आम्ही कुठेतरी मागून चाचपडत उठून चालायला लागतोत. असा काहीसा हा प्रकार, मग स्वतःची समजूत काढण्याकरिता आणि झालेली चूक झाकण्याकरिता, "पुढच्यास ठेच मागचा शहाणा" असे म्हणून समाधान मानतो. हे सांगायचं कारण असं झालं की, "गेम ऑफ थ्रोन्स", २०११ सालची वेब सीरिज समजायला आम्हला फेब्रुवरी २०१९ उजडावा लागला व प्रत्यक्ष ते पाहण्यास सुरवात केली मे २०१९ पासून, कस बस एका मित्रा कडून ढापून आम्ही गेम ऑफ थ्रोन्स पहायला सुरवात केली. दररोज न चुकता एक-दोन तर कधी रविवारी सुट्टीच्या दिवशी तीन-चार एपिसोड पहायचा निर्धार केला, सध्या हा नित्यक्रम झाला आहे. जणू "पारायणं" चालू आहे (पारायणं ही बायकोची उत्क्रांती) कारण मी सध्या दररोज ऑफिस वरून आलो की पुढचा एपिसोड सुरु करून पाहत असतो व त्यात माझा संध्याकाळचा वेळ जातो म्हणून पारायणं.
सुरवातीस
मूळ कादंबरी वाचून वेब सीरिज पाहण्याचा माझा विचार होता, पण आजूबाजूला असलेल्या स्पॉईलर
मुळे तो विचार मी बदलला आणि सरळ टेलिव्हिजन सीरिज च पारायणं सुरु केलं. ह्या मितितुन
त्या मितीत भ्रमण केल्याचा अनुभव या टेलिव्हिजन सीरिज मुळे आपल्याला घेता येतो. आपल्या
आजूबाजूला एखादा लॉर्ड किंवा राजा बसून वाईन चे चषकावर चषक संपवत असतो, कोठून तरी सैन्याच्या
हालचालींचा आवाज येत असतो, लावण्यखणी राणी समोरून जात असते, तर कधी तलवारींचा खणखणाट
व युद्धाच्या ललकारी कानात गुंजत असतात. "Game of Thrones" म्हणजे
"सिहांसनाचा खेळ" किंवा "सत्तेचा खेळ" ह्या टेलिव्हिजन सीरिज चा HBO वाहिनीवर पहिला एपिसोड १७ एप्रिल २०११ रोजी टेलिकास्ट
झाला तर शेवटचा १९ मे २०१९. साधारण ८ वर्ष चालू असलेली टेलिव्हिजन सीरिज George RR
Martin यांच्या फॅन्टसी कादंबरी A Song of Ice & Fire वर आधारित आहे. हा सुद्धा
सात पुस्तकांचा संच आहे व जो १९९६ ते २०११ या काळात प्रकाशित झाला.
हा
सिहांसनाचा खेळ मुख्यतः मानवाच्या तीन गरजांची संबंधित आहे. १) सत्ता (power) २) संपत्ती
(Money) ३) सेक्स, ह्या तीन गरजा धरूनच पूर्वी पासून मानवच समाजकारण घडत आले आहे. त्याचे
यथायोग्य चित्रण या सीरिज मध्ये दिसते. युरोप व पाश्चिमात्य देशातील मध्य युगीन कालखंडचे
चित्रण या मालिकेत आपल्याला पहायला मिळते. एक प्रगत संस्कृती ज्यात व्यापार, कला, साहित्य,
विज्ञान याचे दर्शन तर घडतेच पण त्याच बरोबर मानवाची सत्ता पिपासूं वृत्ती इतरांच्या
जीवाची व इतर कशाची ही पर्वा न करता कोणत्याही थराला जाऊ शकते ह्याचे सुद्धा दर्शन
होते. कालखंड मध्ययुगीन व युरोपातील असल्यामुळे सहाजिकच रूढी, परंपरा, अंधश्रद्धा,
नियम त्या काळातील आहेत. जन्म, मृत्यू आणि त्यांचे संस्कार सुद्धा त्या काळा प्रमाणेच
दिसतात. या मालिकेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब व्यवस्था आणि लग्न संस्कार त्या
वेळच्या समाजाचे सुद्धा महत्वपूर्ण अंग यात दाखवले आहे. भौगोलिक दृष्ट्या युरोप सोबत
रशिया व चीन संस्कृती सुद्धा आपल्याला दिसून येते. उत्तर आफ्रिकेतील किंवा पश्चिम आशियातील
देश असे सुद्धा चित्रण यात पहायला मिळते. पण स्थळ व ठिकाणांची नावे मात्र काल्पनिक
आहेत. अर्थात ते मी येथे सांगणार नाही. मुळात लेखकाने हे काल्पनिक चित्र अत्यंत योग्य
पणे आणि मापक रंगवले आहे. कोठेही अवास्तव व अति काल्पनिक मांडणी या सीरीज मध्ये नाही.
दिगदर्शकाने सुद्धा cinematic liberty च्या नावाने मूळ कथेस कसलीही छेड छाड़ केलेली
जाणवत नाही.
वेग-वेगळी राज घराणे आणि त्यांचा सिहांसनावरील हक्क व त्याकरिता चालणारे राजकारण या प्रमुख सुत्रा भोवती जरी हे कथानक विणलेले आसले तरी मानवाच्या विविध पैलूंचे दर्शन या माध्यमातून होते. मालिकेतील राज्य व्यवस्था ज्याप्रमाणे युरोपचा प्रभाव जाणवतो त्याच प्रमाणे समाज व्यवस्थे वर ख्रिस्त धर्माचा प्रभाव जाणवतो. शारिरीक संबंधाच्या बाबतीत लेखकाने चांगलाच मोकळा हात सोडलेला दिसतो. शारिरीक संबंध हे नाते संबंधा पेक्षा महत्वाचे दाखवले गेले आहे. समलिगी संबंधनाची सुद्धा मांडणी या कथेत दिसून येते. मात्र कोणतेही शारिरीक संबंध मूळ कथेला धरूनच आहेत असे दिसते. कसल्याही प्रकारची अवास्तव व अश्लील मांडणी कथेत नाही. “Night is full of dark, किंवा Winter is coming” आशा असंख्य संवाद कथानकाची उत्कंटा वाढवायला मदत करता. सर्व पात्रांनी योग्य अभिनय केला आहे.
या सीरिज ची तुलना काही माध्यमातून महाभारताशी केलेली मला दिसली. काहींचे म्हणणे असे जाणवते की हे कथानक तेथील महाभारत च आहे. मी या मताचा नाही व मला हे कथानक इकडचे-तिकडचे महाभारत वाटत नाही. मुळात महाभारताचा एकांगी विचार करणाऱ्यांना असे वाटू शकते. "युद्ध" हा एकच निकष लावून लिहलेले हे कथानक कसे काय महाभारताशी तुलनात्मक असू शकते??? लेखकाने व दिग्दर्शकाने कथेचे स्वातंत्र्य जपलेले दिसते, मात्र आपण याची तुलना जगातील कोणत्याही महा काव्याशी करणे मूर्ख पणाचे ठरेल.
सत्ताकारनाची आवड असणार्यांनी जरूर ही सीरिज पहावी कारण यातील प्रत्येक घटना त्याशिवाय पचनी पडणार नाही.
विराज


