#कोजागरी_पोर्णिमा #चारोळी
हातात प्याला
दुधाचा
श्वासात-श्वास
प्रेमाचा
गुणतून चढतो
रंग प्रणयाचा
...............................................................................
पौर्णिमेच्या
प्रकाशात
बघतो मी
चंद्राला
चांदण्याच्या
सड्यात
निखारतो मी
प्रीतीला
...............................................................................
मला जमलेच नाही
सांगणे
त्या मुक्त लावण्याला
चोरट्या नजरेने
आज सुद्धा
बघतो त्या
पौर्णिमेच्या चंद्राला
विराज