रामायण मालिका पूर्ण झाली, काल दुरदर्शने एक ट्विट करून सांगितले १६
एप्रिल या दिवशी ७.७ करोड लोकांनी रामायण पहिले त्यामुळे रामायन जगातील सर्वात
जास्त पाहिले जाणारी मालिका ठरले आहे. या अगोदर गेम ऑफ थ्रोन्स १७.४ मिलियन तर बिग
बँग थेअरी १८ मिलियन लोकांनी पहिले. पुनः प्रसारित रामायणाने विश्व कीर्तिमान
स्थापन केला आहे. ही माहिती मागच्या दोन तीन दिवसात सर्वत्र झालेली आहे त्याबद्दल
विशेष बोलणे असे काही नाही. मुळात दूरदर्शन वर या मालिका पुनः प्रसारित व्ह्ययला
लागल्या तेव्हाच भारतातील काही लोकांच्या पोटात दुखायला लागले होते, त्रास व्हायला सुरवात झाली होती.
रामायण-महाभारताने कोठे करोना बरं होणार आहे का? दूरदर्शनचे भगवा कारण झाले आहे. रामायण-महाभारत दाखवून करोना
रुग्णाची संख्या दडपण्याचा सरकारची योजना आहे असे एक न अनेक गोष्टी चर्चा केली
गेली. पण सामान्य प्रेक्षकांनी आणि भारतीयांनी या सर्व कथाकथित विचारवंताना
फाट्यावर मारत रामायणा ला सर्वात जास्त View दिले.
अर्थात ही बाब आपल्या सर्वाना मान्य करावीच लागेल की रामायण-महाभारत कधीच करोना
महामारी चा प्रभाव कमी करू शकणार नाही किंवा त्यावर हे (मालिका) औषध ही असणार नाही
कारण ते जसे आध्यात्मिक धारावाहिक आहेत तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा आहेत. या
मालिका पुःप्रसारित नसत्या झाल्या तर या लॉकडाऊन च्या ४०-४५ दिवसाच्या काळात
मनोरंजन ही एक खूप मोठी समस्या भारतात निर्माण झाली असती, वाटायला तशी सामान्य पण प्रचंड भयानक स्वरूपाची
समस्या आहे,"मनोरंजन"
करोनाच्या पार्शवभूमीवर याचा थोडा विचार होणे
गरजेचे आहे असे मला वाटते. मनुष्याची महत्वाची
गरज ही मनोरंजन आहे,
व हे कोणीच नाकारू शकत नाही. काळानुरूप
त्याचे महत्व आणि स्वरूप यात नक्कीच बदल झालेले आहेत व व्यक्तिसापेक्ष मनोरंजन
मनुष्याच्या स्वभावात असते. एकाएकी करोनाच्या विस्फोट मुळे ज्या प्रमाणे इतर
मानवाच्या गरजा वरती त्याचा परिणाम झाला त्याच प्रमाणे मनोरंजन क्षेत्रावर सुद्धा
त्याचा परिणाम झालेला दिसून येत आहे. पर्यटन हे एक महत्वाचे मनोरंजनाचे साधन या
काळात पूर्ण पणे बंद आहे,
लोक संचय व लोकांचे एकत्र येणे यावर
बंधने आहेत, त्यामुळे नवीन चित्रपट, नाटक, मालिका
निर्मिती बंद आहेत, चित्रपट व नाट्यगृह सुद्धा पूर्णपणे
बंद आहेत. कुटुंब आणि घरातील सदस्या शिवाय इतर कोणाशी सुद्धा संपर्क ठेवणे, भेटणे, बोलणे
धोका दायक ठरत आहे. सततच्या येणाऱ्या वाईट बातम्या आणि या महामारीमुळे होणारे
लोकांचे हाल या शिवाय कानावर काही पडत नाही, या
महामारी नंतर येणारी आर्थिक मंदी ही वेगळीच समस्या असंख्य लोकांसमोर आज जागतिक
स्थरावर उभी आहे. अनेक लोकांच्या नोकऱ्या, काम, व्यवसाय या महामारी मुळे बंद पडू शकतात अशी
परिस्थिती निर्माण झाली आहे. या काळात मनुष्य प्रचंड मानसिक तणावातून जात आहे
अशावेळी मनोरंजन खूप महत्वाची भूमिका बजावत असते, मानसिक आधार आणि पुनः उभे राहण्याचा विश्वास मनोरंजनातून येत असतो.
अनेक उदाहरणे देत येतील ज्यामुळे प्रेरित होऊन अशा मानसिक समस्यावरती मत केलेली
आहे.
या मालिका, चित्रपट
आपल्या मनावरील ताणा ला दूरकरण्याचं काम करतात, व
त्यामुळेच रामायण मालिका मागील काही दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात पहिली गेली असे
मला वाटते
धन्यवाद
विराज
viraj.devdikar@gmail.com
विचार पटल्यास जरूर शेअर करा आणि लिहा
