एखाद्याला मोठे करणारा गुरु आसतो,
एखाद्याचा छोटेपणा दाखवणारा गुरु आसतो !!
एखाद्याला निरक्षराला साक्षर करणारा गुरु आसतो,
एखाद्या साक्षराला सु-संस्कृत करणारा गुरु आसतो
!!
एखाद्याचा मित्र गुरु आसतो,
एखाद्याचा शत्रू गुरु आसतो !!
एखादा वयाच्या मोठेपणात गुरु आसतो,
एखादा वयाच्या लहानपणात गुरु आसतो !!
एखाद्याच्या गुणउधळण्यात गुरु आसतो,
एखाद्याच्या कला-गुणांत गुरु आसतो !!
एखाद्याच्या प्रारब्धात गुरु आसतो,
एखाद्याच्या प्रयत्नात गुरु आसतो !!
श्रीमंतीच्या प्रदर्शनात गुरु आसतो,
गरिबीच्या दर्शनात गुरु आसतो !!
आध्यात्माच्या दांभिकपणात गुरु आसतो,
चैतन्य स्वरूपात गुरु आसतो !!
वंचितांच्या शोषणात गुरु आसतो,
वंचितांच्या सेवार्थ गुरु आसतो !!
कधी पदव्यांच्या (Degree) प्रदर्शनात
गुरु आसतो,
कधी नापासांच्या गर्दीत गुरु आसतो !!
कधी वाटाड्या गुरु आसतो,
कधी वाट चुकवणारा गुरु आसतो !!
