लहानपना पासून बैल पोळा हा दिवस खूप काही आठवणीनी
भरलेला आहे, तस बघायला गेल तर माझे घर शेतीवर अवलंबून नसल्यामुळे आणि घराचा आणि
शेतीचा प्रत्यक्ष संबंध नसल्यामुळे म्हणा पण माझा घरी बैल पोळा मातीचे बैल करून
साजरा केला जायचा आणि करत आहोत. बैल हा प्राणी कसा शेतीसाठी उपयुक्त आहे व तो
शेतकऱ्यांचा कसा मित्र आहे हे मी शाळेती निबंधमध्ये लिहून किंवा वक्तृत्व स्पर्ध
बोलून मोकळो व्हायचो. घरी मातीचे बैल करून पोळा साजरा करताना पुरण पोळी मात्र
स्वतःच खायचो,
मात्र नंतर agriculture ला आल्यानंतर या सणा बदल एक वेगळेच कुतूहल
निर्माण झाले, मी मराठवाड्यातील गावात शिकायला असल्यामुळे आणि येथील शेती व्यवसतेत
बैलाल असलेल्या महत्वामुळे मला बैला बद्दलच्या आदरात वाढच झाली. खेड्यातील व
प्रत्यक्ष शेतकरयाच्या घरी जाऊन बैल पोळा साजरा करण्याचा अनुभव आला. यातून शेतकरी
व बैल यांच्या नात्याचा नव्याने उलघडा तर झालाच पण कृतज्ञ भाव हि वाढला. हा छोटाशा
उत्सवातून ग्रामीण जीवनाचा आधार दिसला आणि हिंदू संकृतीची प्राणीमात्रा बदल असलेली
कृतज्ञत: दिसली. ग्रामीण आर्थ व्यवसतेचा कणा असलेला हा सण, आज जरी वेगवेगळ्या शेती
उपकरणामुळे शेती व्यवसतेतील बैलाचे महत्व कमी झाले असले तरी शेतकऱ्याच्या घरातील
बैलाचे महत्व व आदर आज हि तसाचा आहे, व तो चिरकाल टिकेल यात शंका नाही.
धन्यवाद
