घरातून ऑफिस असल्यामुळे ब्लॅक कॉफी मिस करतो, आज सकाळी बायकोला सांगून खास ब्लॅक कॉफी करून घेतली. ऑफिस आणि कॉफी हे नवीन समीकरण जुळलं आहे. घरी चहा घेणाऱ्यां पैकी ९०% ऑफिस मध्ये कॉफी घेतात यात वेगळा असा काही नाही. मशीनमधल्या चहा पेक्षा कॉफी बरी लागते असे कारण असेल. जस भारतात एकूण चहाच प्रस्त आहे तस वेगवगळ्या देशात वेगवेगळ्या पेयांचा प्रस्त दिसत, सर्वच आशियायी देशात चहाची आवड दिसते त्यामानाने ब्रिटन सोडून इतर पाश्चिमात्य देशात चहा पेक्षा कॉफी च प्रस्त आहे. प्रत्यक्ष असं कारण काहीच नाही पण एक प्रासंगिक घटना या निमित्याने आठवली म्हणून हा धागा लिहायला घेतला.
वर्ष होत १७७३ च अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध चा
सुरवातीचा काळ होता. अमेरिका त्यावेळी भारता प्रमाणेच ब्रिटनची वसाहत होती(colonial rule). ब्रिटन ची एक महत्व पूर्ण कंपनी "ईस्ट
इंडिया कंपनीची" राजवट अमेरिकेत होती, ईस्ट इंडिया कंपनी इतर आशियायी वसाहती मधून कच्चा माल घेऊन जायची त्यावर ब्रिटन मध्ये
मोठं-मोठ्या कारखान्यात प्रक्रिया करून तो पक्का माल/वस्तू अमेरिकेत व वसाहती
मध्ये विकला जायचा. त्याचा मजबूत नफा कंपनीला व्हायचा, त्यावेळेसच्या ब्रिटिश अर्थव्यवस्थेत कंपनीला
खूप महत्व होते, कंपनीतून येणारे पैसे ब्रिटन करिता
महत्वाचे उत्पन्नाचे साधन होते. अमेरिकेत वसाहतीत राहणारे लोक हे मुळातील ब्रिटनचे
नागरिक होते आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारामुळे ब्रिटन नागरिकांना सुद्धा
त्रास व्हायला सुरवात झाली होती. आशा वेळीच १० मे १७७३ ला ब्रिटिश पार्लिमेंटने अमेरिकेवर व एकूणच सर्व वसाहतीं
वर एक कायदा थोपला त्याचे नाव "टी ऍक्ट"(Tea Act) होते, या कायद्यानुसार कंपनीला चहाच्या आयात
व विक्रीचे एकाधिकार मिळणार होते, त्यामुळे
बाजारात (अमेरिकेतील व इतर वसाहतेतील) कंपनीची monopoly तयार होणार होती. या कायद्यातून कंपनीच्या महसुलात वाढ होणार होती पण
त्यापेक्षा महत्वाचे कारण सर्व वसाहतींच्या बाजार पेठेत कंपनीचा धाक निर्माण करणे
हे होते. विशेष म्हणजे हा कायदा निर्माण करताना ब्रिटिश पार्लिमेंट मध्ये इतर
वसाहती प्रमाणे अमेरिकेचे सुद्धा प्रतिनिधीत्व नव्हते. तरी असा एक कायदा निर्माण
करून ब्रिटन ईस्ट इंडिया कंपनी च्या फायदा करण्याकरिता प्रयत्न करत होता.
१६ डिसेंबर १७७३ रोजी अमेरिकेतील बॉस्टन बंदरात ईस्ट इंडिया कंपनीची डार्टमाऊथ, एलेनोर आणि बेअवेर या नावाची तीन जहाजे येतात, या जहाजा मध्ये भरून चीन व भारतातून आणलेला चहा होता. तो चहा अमेरिकेत विकण्याचा सर्वाधिकार कंपनीला "टी ऍक्ट" नुसार मिळाला होता. या विरोधात अमेरिकेच्या वसाहतीने या तीन जहाज भरून असलेला चहा वापस पाठवण्याची विनंती Massachusetts च्या गव्हर्नर Thomas Hutchinson ला केली, गव्हर्नर ने ती फेटाळून लावली, त्याविरोधात अमेरिकन स्वातंत्र्ययोद्धा Samuel Adams यांच्या नेतृत्वा खाली बॉस्टनच्या बंदरात "टी पार्टीचे" आयोजन केले, या पार्टीला "सन ऑफ लिबर्टी" चे ६० कार्यकर्ते उपस्थित होते त्यांनी १६ डिसेंबर च्या रात्री ईस्ट इंडिया कंपनीच्या तीन जहाज मधील ३४२ लाकडी पेट्यातील चहा बॉस्टन च्या समुद्रात ओतून दिला. त्यावेळेस पासून या घटनेला "बॉस्टन टी पार्टी" म्हणून ओळखले जाते, या घटने नंतर अमेरिकी लोकांत चहाचे प्रेम कमी होऊन कॉफी ची आपुलकी निर्माण झाली असावी.
अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाची खरी सुरवात या बॉस्टन टी पार्टी पासून झाली व त्या घटनेचा नायक Samuel Adams हे अमेरिकेच्या Founding Fathers पैकी एक होते. नंतर च्या काळात ते Massachusetts चे चार वेळेस गव्हर्नर सुद्धा राहिले.
धागा आवडला असेल तर जरूर RT करा विराज देवडीकर



