Tuesday, 21 April 2020

विश्वंतर



दिवंगत जगविख्यात शास्त्रज्ञान स्टीफन हावकिंग यानी काही वर्षां खाली एक भविष्यवाणी केली होती, २६०० व्या शतकात पृथ्वी अग्निचा गोळा होईल आणि २०१७ मध्ये त्यांनी अजून एक भाकीत केले होते ते म्हणजे मानवतेला पृथ्वीवरील फक्त १०० वर्ष उरले आहेत. पृथ्वीच्या ऱ्हासास मानव आणि फक्त मानवच जवाबदार असणार आहे हे निश्चित आहे. मागील काही दिवसांपासून चालू असलेला उत्तर कोरिया आणि इतर देश हा संघर्ष पहिला तर हे स्पष्ट जाणवेल. जागतिक राजकारणावर मी फार बोलणार नाही. एक कल्पना करून तर पाहू, विश्वांतराची.....
म्हणजे असे पहा, आताची जी माझी पिढी आहे की ज्याचे वय २० ते ४० मध्ये आहे अशी पिढीचे नातवंड-पतवंड अशा विश्वांतराचे भाग असतील. आजची प्रचंड गजबजलेली भारतातील शहरे त्यावेळी अक्राळ विक्राळ रूप घेऊन जगा समोर उभे असतील. लोकसंख्येची झालेली भरमसाठ वाढ व त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या पृथ्वीला नष्ट करायला पुरेश्या असतील. ग्लोबल वॉर्मिंग मुळे पृथ्वीच्या तापमानात प्रचंड वाढ झाली असेल. सामान्य माणसाला उघड्या अंगाने सूर्यप्रकाशात फिरणे कठीण झालेले असेल ठीक ठिकाणी Ozone स्थराला भोक पडली असतील त्यातून अतिनील किरणांचा मारा पृथ्वी वर होत असेल. पृथ्वीवरील काही भाग निर्मनुष्य व निरवृक्ष झालेला असेल. त्या भागात जायचे असल्यास oxygen सायलेंडर घेऊन जावे लागेल. पाण्याची स्थिती वेगळीच असेल, समुद्र पातळीत प्रचंड वाढ झाल्याने खारे पाणी विपुल आणि नद्या कोरड्या असल्यामुळे पिण्यासाठी पाणी नसेल. समुद्र काठची शहरे पाण्याखाली गेलेली असणार आहेत. मानवाचे आयुष्यमान निम्यावर म्हणजे वय वर्ष ५० झालेले असेल, कारण भरमसाठ लोकसंख्या वाढी मुळे ५० पुढील व्यक्तींना वाचवण्यासाठी आरोग्य आणि इतर सुविधांचा अभाव असणार आहे. पेट्रोल व खनिज तेल संपल्यामुळे बायो फ्युवेल वर अवलंबून राहावे लागेल त्याच्या उत्पादना साठी प्रचंड जंगल तोड किंवा वनव्याने जंगले संपवली असतील, खरवलेल्या जमिनी आणि अती रसायनाच्या वापरामुळे कृषी उत्पन्न घटले तर असेलच पण त्याची गुणवत्ता आणि चव संपली असेल. 

राजकीय समस्या तर यापेक्ष खूप भयानक असतील, जागतिक पातळीवर इस्लामिक radical संघटना आणि विस्तारवादी चीन त्यांच्या ताब्यात जगाचा खूप मोठा भाग असेल, त्यामाध्यमातून धार्मिक आणि राजकीय परतंत्र निर्माण झाले निर्माण झालेले असेल. संवेदना बोथट झालेल्या असतील आणि आर्थिक विषमता प्रचंड असेल. याच काळात AI (Artificial intelligence) मुळे राजकीय व सामाजिक प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली असेल, आजच्या छोटया प्रमाणात होणाऱ्या Data theft मग ते सोशल मीडिया द्ववरे असेल किंवा इतर मार्गाने असेल तेच उद्याचे AI चा राक्षस तयार करेल. माणसाचे हुबे-हब clone चीन ने तयार केलेले असतील व त्याच्याच फौज उभारल्या असतील.
माणसाला व मानवतेला वाचवन्यासाठी मंदिरे कदाचित नसतील ही पण सोबत चर्च आणि मशिदी सुद्धा नसतील, माणसा कडे विश्वंतर करण्याशिवाय पर्याय नसेल. मंगळवासी आणि चंद्रकर ही कदाचित नवीन मानवतेची ठिकाणे असतील....

हे एक कल्पना चित्र आहे पण कल्पना वास्तव होऊ नये 

(वरील लेख २०१८ मध्ये लिहलेला आहे त्यामुळे आजचे संदर्भ नाहीत)

Viraj Devdikar

#Doomesday #World_Earth_Day #SaveEarth #Human