हजारो वर्षनंतर
जगाच्या उत्खननात माझे कोणते अवशेष सापडतील हे माहित नाही, पण स्वतःचे अवशेष
सापडावेत म्हणून प्रत्येक जन धडपडत आसतो. कोणी स्वतःच्या हिंमतीवर जग जिंकायची स्वप्न
बघत आसतो, तर कोणी दुसऱ्याला हरवून स्वतःचे आस्तित्व टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न
करत आसतो. कोणी स्वतःचे आस्तित्व दाखवण्याकरिता “मुलगा” हा वंशाचा दिवा म्हणून
दिवे लावत आसतो, तर कोणी न बोलता खूप काही काही लिहून ज्ञान ज्योती पाजळत आसतो. मात्र
सर्वाचे उद्दिष्ट एकच असते ते म्हणजे माझे स्वतःचे “अवशेष”.
कधी-कधी आसे वाटत
राहते की, हडप्पा-मोहिंदजडो किंवा सिंधू संस्कृतीचे जणू काही स्वतःचे आस्तित्व
दाखवण्यासाठीच “अवशेष” जपून ठेवले. खरा तर स्वतःच्या मरण नंतर स्वतःचे आस्तित्व
दाखवण्याकरिता थडगे बंधणारी माणसाची जात आहे. आणि त्यातून निर्माण होणारा स्वतःचा
स्वतःशीच असलेला संघर्ष, कारण टीकवायचे आहे ते स्वतःचे आस्तित्व. चुकूनही आपल्या
हातून काही घडले आणि ज्यातून आपल्या अस्तित्वाबदल प्रश्न निर्माण व्हायला नको
म्हणून मग हा संघर्ष हि नको, आहे तसे राहू द्यायचे.
कदाचित मानवाने
नाते-संबंध सुद्धा त्याकरिता निर्माण केले असणार, “हा माझा मुलगा, तो माझा आमुक,
ती माझी तमुक” आसे सांगून माणूस आपले आस्तित्व दाखवत आसतो आणि अवशेष जपत आसतो.
मानवास स्वतःच्या अवशेषाचा लोभ थोडा जास्तच आसतो. मानव जोपर्यंत जगतो तो पर्यंत तो
आस्तित्व जपतो आणि स्वतःच्या मृत्यूनंतर ते त्याच्या येणाऱ्या पिढ्यांनी जपावा आशी
अभिलाषा मनी धरतो.
कुठल्याशा एका देशीच्या
राजाने म्हणे स्वतःचे थडगे मरणा पूर्वीच बांधून ठेवले होते, ते इतके भव्य-दिव्य
होते की जणूकाही महालच, ते सर्व सुख-सोयीनी युक्त होते. त्याद्वारे राजाने स्वतःचे
अवशेष येणाऱ्या पिढ्यांना दिले. पण त्याच्या मरणा नंतर काही वर्षातच ते थडगे रुपी
महाल चोर लुटारुचे ठिकाण बनले व त्यातील संपत्तीचा उपभोग चोरांनी घेतला. आर्थत
यातून राजाचे इच्छित साध्य झालेच नाही. पण आपण आज येथे त्याच्या वेडपटपणा बद्दल
बोलत आहोत हे सुद्धा एक प्रकारे त्याचे अवशेष जपण्यसारखेच आहे ना???
Sprouts…

No comments:
Post a Comment