#जय_श्रीराम
आज सकाळी तेर जिल्हा उस्मानाबाद येथल्या श्रीराम मंदिरातील रामाचे दर्शन झाले,अत्यन्त प्रसन्न पण तेवढीच तेजस्वी मूर्ती असे श्रीरामाचे दर्शन. गावाकडची राम नवमी असल्यामूळे वातावरण कसे उत्साही असते. राम नवमी आणि राम जन्मोत्सव कार्यक्रमा तसा नवीन नाही गाव कडे म्हणजे उस्मानाबादला असतांना शहरातील वेगवेगळ्या मंदिरात साजरा होत असलेल्या राम जन्मसोहळ्या उपस्थित राहायचो, पुण्यात आल्यापासून अशा सगळ्या सोहळ्यानं मुकलो आहे. पण त्यावेळी काही वेगळीच मज्जा असायची. आम्ही घरचे सर्व समर्थ नगर मधील राम मंदिरात राम नवमी करीता जायचो, चैत्राचा महिना असल्यामुळे उष्ण वातावरण तर असायचेच तर आंब्याला आलेल्या कैऱ्यांचा वास दरवळत असायचा, थंडगार कैरीच्या पन्ह्या ची आंबट गोडं चव अजूनही जिभेवर तरळती आहेच. घरात आध्यात्मिक वातावरण असल्यामुळे सार्वजनिक उत्सवात हीरीरीने सहभाग घ्यावा लागत असे मग राम नवमी असेल किंवा कृष्णाअष्टमी असेल, त्या त्या मंदिरात, धार्मिक स्थळी जाऊन सेवा करावीच लागत असे, त्यामुळे समाजात वावरण्याची शिकवण मिळते. वेगवेगळ्या जवाबदाऱ्या घेऊन सामाजिक काम करण्याची संधी मिळत असे, अशा उत्सवात कधी मंदिर साफ सफाईची जवाबदारी असे तर कधी मंदिर सजावटीची कामे असत. कधी महाप्रसादा ची व्यवस्था असे तर कधी जेवणावळी वाढण्याच्या कामात असत. वेगवेगळ्या व्यवस्था असत ज्यात सेवा कार्य चालत असे, अशा जवाबदाऱ्या घेऊन सर्वांनी मिळून तो उत्सव यशस्वी होईल या करिता प्रयत्न करत असत.
अशा वातावरणात बालपणा पासून राम कृष्णांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो, आता काल्पनिक वाटणाऱ्या या चरित्राचा मना वरती खूप मोठा बडगा आहे, आज सुद्धा प्रामाणिकपणा व नीतीमूल्य याचा वस्तुपाठ म्हणून श्रीराम चरित्रा कडे पहिले जाते. जे आस्तिक आहेत त्यांना तर राम मान्यच आहे पण नास्तिकांच्या सुद्धा विचारात राम आहे हे जाणवून जाते. एखाद्या चरित्राच्या अस्तित्त्वा करीत आवश्यक असलेले वस्तुनिष्ठ पुरावे या दोन्ही चरित्राकरीत आज उपलब्ध नसतील ही पण यांच्या कल्पनात्मक चरित्रातून समाज निर्माण करण्याची शक्ती आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. श्रीराम मना मनात रुजवायचे म्हणजे मनातील विघटनकारी रावणाचा विनाश करणे होय, तर आणि तरच एक समाज एक राष्ट्र निर्माण होऊ शकते, कदाचित राम राज्य ही हेच असेल. श्रीराम-कृष्ण या दोघंच्या ही चरित्र करणी ही शिकवण मोठ्या खुबीने मंडळी आहे. श्रीराम चरित्र हे समाज घडवण्याचे खूप मोठं साधन आहे असे मला वाटते, आणि चरित्रवन समाजच कल्याण करी समाज असू शकतो असे मला वाटते. अशाच कल्याणकारी समाजाची प्रभू श्रीरामचंद्रा कडे अपेक्षा करू आणि रघुनाथास विनम्र अभिवादन करूयात.
जय श्रीराम

No comments:
Post a Comment