२००८ ला पुण्यात आलो शिक्षणा करिता, त्या अगोदर आयुष्यातील २०-२२ वर्ष मराठवाड्यातील कमी पर्जन्यमान भागात घालवले होते, त्यामुळे पावसाचे वेगळेच आकर्षण निर्माण झाले होते. तस पावसाळा हा फार काही आवडता ऋतू वगैरे आहे असे मला वाटत नाही, सौमित्र (गारवा अलबम) मध्ये जस म्हणतो तसेच काहीस माझे मत आहे. पावसाळा फार काही मला रुचत ही नाही आणि पटत ही नाही. म्हणजे उन्हाळ्यात मनावर धूळ साचते, आणि पावसाच्या पाण्याने त्याचा चिखल होते. मरगळ येऊन जाते साली पावसाळ्यात मनावरती. खूप नवल वाटते जे पावसाळ्याला रोमँटिक म्हणतात, कवीची कल्पना मान्य हो पण वास्तव असे काही आहे का नाही जगात ! पावसाळा मुळातच चिकट आणि चिवट मग तो रोमँटिक कसा असेल. कृषी विज्ञान शाखेत शिक्षण झाल्यामुळे पावसाचे महत्व जाणतोच पण ते सुद्धा पावसाचे वास्तववादीच स्वरूप आहे, उगाच फापट पसारा नसतो त्यात.
-------------------------------------------------------------------
मराठवाड्यात आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादला असताना पावसाळा फार काही असतंच नाही. उस्मानाबाद चा पाऊस म्हणजे कधी तरी वेळ काढून पडणारा आणि काही वेळे पुरताच. म्हणजे कधी कधी तर पडला तर पडला नाही तर कोरडा गेलेला पावसाळा सुद्धा मला आठवतो, त्यामुळे पावसा बद्दल फार काही आकर्षण मनात निर्माणच झालं नाही. पावसात भिजवा म्हटलं तरी अर्ध अंग कोरडेच राहायचे आणि पावसाचे पाणी भिजण्यासाठी नसून पन्हाळीतून एकत्र करून वापरण्यासाठी असते असा काहीसा उस्मानाबादचा पाऊस. म्हणजे आमच्या इकडे पावसाळ्यात छत्री घेऊन बाहेर पडायचे ते पावसाच्या पाण्यापासून वाचण्याकरीत की उन्हं पासून हेच कधी कधी समजायचे नाही. आमच्या इकडे पाऊस कमी असला तरी माणसाच्या मनातील गारवा कधी कमी झाला नाही.
------------------------------------------------------------------
पुण्यात आल्यावर खरा पावसाळा कळायला लागलं, स्टाईलीश छत्री पेक्षा गोल व काळी छत्री कशी उपयोगी पडते ते पुण्यात कळले. एका छत्रीत एकानेच प्रवास करावा. रेनकोट पूर्ण अंग झाकणार आणि दुहेरी शिवणीचा असावा असे काहीसे नवीन नियम पावसाळ्याचे कळले. दिवस दिवस पाऊस असणे आणि ओले चिंब भिजणे पुण्यात आल्यावर कळले. पावसाळ्यात कांद्याचे गरम गरम भजे करणे हे स्वाभाविक आहे पण बियर च्या ऐवजी विस्की-रम पिण्याची इच्छा होणे म्हणजे मुसळधार पावसाची सुरवात होय. सिंहगडावर भिजणे पर्यटन असते तर पुण्यात भिजणे कंटाळवाणे असते हा भिजन्य भिजण्यातला फरक, पावसाळा स्वतः सोबत वेगवेगळे रूप घेऊन येतो आणि हेच पावसाळ्याचे वैशिष्ट्य असते. त्याला स्थल-काल नियम लागू पडतात. उजाड वाळवंटात चैतन्याची पालवी फुलवतो पाऊस, घटकभराच्या शिडकाव्यातून बदलाची शक्ती देतो पाऊस...!!!
©विराज

No comments:
Post a Comment