जून महिना आला की शाळा सुरु होण्याचे वेद लागतात, आणि डोळ्या समोरून सहज तरळून जातात लहानपनीच्या आठवणी, ते नवीन पुस्तकांचे वास, वह्या-पुस्तक खरेदीची लगबग, नवीन दप्तर, कंपास पेटी, पेन-पेन्सिल, रंग पेटी अनेक गोष्टी आठवतात. आता पूर्वी सारख्या जून मध्येच सगळ्या शाळा सुरू होतात च असे नाही काही एप्रिल पासूनच चालू झालेल्या असतात. स्पर्धेच्या नावा खाली आणि काही तरी वेगळं करायचं म्हणून आजकाल वर्ष भर शाळा चालू असतात, त्यामुळे शाळेच्या मोसमाची अशी मजाच लुटता येत नाही. जुने वर्ष कधी संपले आणि नवीन कधी सुरु झाले हे लक्षातच येत नाही. नाही त्या वेळेत भरमसाठ सुट्ट्या दिलेल्या असतात. आपलं आयुष्य किती पर्यावरणा वरती अवलंबून आहे हे संस्थाचालक विसरूनच गेले आहेत. आता हेच बघणं उष्णकटिबंधी (Sub Tropical) प्रदेशात राहणाऱ्या मुलांना हिवाळ्यात सुट्ट्या आणि उन्हाळ्यात शाळा असा काहीसा वेडपट प्रकार चालू असतो. त्यामुळे शाळा चालू होण्याचे काही नावीन्यच
राहिले नाही, पण त्याबद्दल आज मी जास्त बोलणार नाही, तो आजचा विषय नाही.
मागील आठवड्यात मित्राच्या घरी चर्चा करत असताना शाळा व सध्याचे शिक्षण याबद्दल बोलत होतो, आणि तेवढीच काळजी ही व्यक्त होत होती. शिक्षणाचे बाजारीकारण आणि शाळांचे शुल्क(fees) या मुळे बेजार झालेले पालक हे सर्व चर्चेत आलेच पण त्यापुढे जाऊन आजच्या पारंपारिक शिक्षण पद्धतीने आपल्या पाल्यास स्पर्धक बनवायचे आहे का??
की जो आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक घटने कडे फक्त स्पर्धा म्हणून बघेल व त्यामागे धावत राहील, असे व्यक्तिमत्व जे सदा सर्वदा competition mode मध्ये राहील.
की एक स्व: निर्मित व्यक्तिमत्व बनणे अपेक्षित आहे ज्याला "स्व" ची ओळख आहे. सर्जनशीलता (Creativity) आणि उत्कृष्टता (excellence) या दोन गोष्टींच्या भांडवलावरी आयुष्यात काही तरी निर्माण करू शकेल, ज्याचे पैसा हे परिमापक असणार नाही, ज्याचे पैसा हे साधन
असेल साध्य नसेल. असे व्यक्तिमत्व घडवने ही शिक्षणाची जवाबदारी आहे असे मला वाटते.
त्यामुळे पारंपारिक शिक्षण पद्धतीला फाट्यावर मारून Home Schooling नावाचा प्रकार जन्म घेताना दिसत आहे. Home Schooling म्हणजे काय तर आपल्या पाल्याला घरातूनच प्राथमिक शिक्षण देण्याची सुरवात करणे व आवश्यक आणि गरजेचे सर्व काही त्याला शिकवणे. आई वडिलांनी त्यांचे गुरु होणे आणि समाजात त्यांना स्वतःचे स्थान निर्माण करता येईल असे बनवणे. Home Schooling प्रकारात आई-वडील शिक्षकाच्या भूमिकेत असता तर विद्यार्थी पाल्य असतो, आर्थिक बाबीचा विचार करता प्रचलित शिक्षण पद्धती पेक्षा खूप स्वस्त आणि उपयुक्त ठरू शकते. जस प्राथमिक शिक्षणाचे आहे तसेच माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणा चे करता येईल, फक्त आपल्याला आपल्या पाल्याची रुची व आवड समजायला हवी. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या आशा-अपेक्षा त्याच्यावरती लादणे नसावे. पाल्याला डॉक्टर-इंजिनियर बनवण्याचे फॅड सध्या संपले असले तरी पैसे बनवण्याचे मशीन म्हणून त्यांचा कडे बघणे सोडावे लागणार आहे. दोन तीन पालकांनी एकत्र येऊन या प्रकारे गृह शाळा निर्माण केल्यास या प्रकारचे शिक्षण देणे सोपे होईल.
या मधील सर्वात मोठी अडसर ही "समाज व्यवस्था" आणि "शासन व्यवस्था" आहेत. कारण हा त्यांचा विरोधातील उघड उघड केलेला बंड असेल, त्याला ते कितपत स्वीकारतील यात शंका आहे. सर्व पालकांना जरी या विद्रोहात सहभागी होणे शक्य होईल असे नाही, आर्थिक सामाजिक व मानसिक बंधन आहेतच पण ज्यांना शक्य आहे त्यांनी जरूर प्रयत्न करावा. Right of Children to Free and Compulsory
Education (RTE) Act, 2009 नुसार भारताता HS कायदेशीर आहे पण जो पर्यंत शासन व्यवस्था या शिक्षण पध्द्तीला मान्यता देत नाही तो पर्यंत सर्वसामान्य याला स्वीकारतीलच असे नाही.
धन्यवाद
©विराज

No comments:
Post a Comment