स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आज आत्मार्पण दिन, २६ फेब्रुवारी १९६६ रोजी प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाणी त्याग करून जीवन संपवणे. सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांचे निधन १६ मार्च १९४६ ला सांगली येथे झाले, त्यांच्या निधना पूर्वी १४ मार्च १९४६ ला स्वातंत्र्यवीर सावरकरानी बाबाराव यांना पत्र लिहले "आता मृत्यूचे स्वागत करावे?" त्यात ते म्हणतात,"आता अगदी हात धरून उभा असलेला मृत्यू हा शत्रू नसून मित्रा सारखा भेटत आहे. लहानपणी ज्या स्वातंत्र्य युद्धाचे कंकण करी बांधले ते यावज्जीव सोडले नाही. घनघोर यातना, दु:खे-सुख ही तसेच. अकडे अंदमान तर तिकडे लाखो स्वजनांच्या जयघोषात हिमालयाच्या शिखरा शिखरावर, काश्मीर, हरिद्वार ते आसाम पर्यंत फडकावलेला कीर्तिध्वज ! पण घनघोर दुःखात तसेच सुखात याच कार्यी, त्याच हिंदू स्वातंत्र्याचा क्रांतीचा ध्वज हातातून ढळला नाही. व्यक्तीच्या हातून जी शक्य ती सारी झुंज आयुष्यभर लढवली. तिशीच्या आत फासाशी उभे राहावे लागते तरी झुंजतच राहिलो हे केवढे समाधान! "कर्मण्येवाधिकारस्ते"म्हणून फळा विषयी मी काहीच बोलत नाही" पत्र बाबारावांना लिहले होते, पण यात मृत्यूचा स्वीकार त्यांनी स्वतःच्या मृत्यूच्या २० वर्ष आदीच केला होता.
त्यांचे
विविध अंगी लिखाण त्यांच्या बहु व्यक्तिमत्वाची ओळख करून देते पण त्यांचे
मृत्यूपत्र त्यांच्यातील विज्ञाननिष्ठता अजून स्पष्ट करते, ते
त्यांच्या मृत्यूपत्रात लिहतात," ‘माझे प्रेत
शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी
खांद्यावरून नेऊ नये, किंवा कोणत्याही प्राण्याच्या
गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत
– स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय
बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक
आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ, किंवा
ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अश्या पिंडदानासारख्या
कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत. त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे
इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ मानवी जीवनात असा एकही विषय नाही, ज्यावर
सावरकरांनी लिहिलेले नाही. त्र्याऐंशी वर्षांचे जीवन ते जगले. त्यांना जीवनांत रस
म्हणून राहिला नाही. कारण, त्यांना ह्या आयुष्यांत इतिकर्तव्य
म्हणून कांहीच उरले नव्हते, म्हणून प्रायोपवेशन करत आत्मार्पण
केले. दैनिक मराठा दिनांक २७ मार्च १९६६ आचार्य आत्रे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर
यांच्या निधना नंतर अग्रलेख लिहला त्यांतील शेवटच्या ओळी
धन्योऽहमf ।
धन्योऽहम् ।
कर्तव्यं
मे न विद्यते किंचित्
धन्योऽहम्
। धन्योऽहम् ।
प्राप्तव्यम्
सर्वमद्य संपन्नम् ।
भारत
मातेच्या वीर सुपुत्रास विनम्र अभिवादन
ॐ
शांती ! शांती:!! शांती:!!!


No comments:
Post a Comment