मार्गशीष अमावस्या म्हणजेच दर्शवेळ किंवा येळमावस्य दर वर्षी हा दिवस डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात येतो. तसे ही साधी अमावस्या पण मराठवाड्यातील काही भागात म्हणजे लातूर उस्मानाबाद जिल्यात आणि कर्नाटकाच्या काही भागात हा दिवस खूप उत्साहाने साजरा केला जातो. ग्रामीण भागातला उत्सव असल्यामुळे शेतीशी संबंध आलाच, हिवाळ्याचे दिवस मराठवाड्यात या दिवसात बोचरी थंडी असते, वर्षभर तसे तापमान जास्त असलेला हा भाग त्यामुळे ही बोचरी थंडी सुद्धा सुखावह असते, त्यात खरिपाची जवळ जवळ सर्वच पीक हातात आलेले असतात, रब्बीची सुद्धा पेरणी झालेली असते अशा वेळी क्षणभर विश्रांती या वेळी हा उत्सव साजरा केला जातो. शेतीवर अवलंबून असल्यामुळे शेतात जाऊन हा उत्सव साजरा करतात, शेतातील रम्य परिसर, रब्बीचे पिके मग गहू, ज्वारी, हरबरा फळ पिके पेरू,बोर, चिंचा, सीताफळ, डाळींब, ऊस या सगळंनी शेती बहरलेली असते. पोहण्याचा मनसोक्त आनंद मग विहरीत असे किंवा नद्यांत (सध्या मराठवाड्यात पाऊस काळ चांगला झाला आहे) उबदार सूर्य प्रकाश आणि थंड हवा यामुळे वातावरण आनंदी आणि प्रफुल्लित होते. मुख्य कार्यक्रम साधाच असतो छोटीशी शेतातील पूजा आणि त्यानंतर वन भोजनाचा आस्वाद असतो.
कृषी प्रधान देशात कृषी पर्यटन आणि उत्सव (agritourism & event) हे ग्रामीण अर्थकारणाला चालना देण्याचे चांगले साधन आहे. मुळात आज भारत सारख्या देशात शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे पण त्यातून मिळणारे उत्पन्न तसे तोकडे म्हणून आज कृषी क्षेत्रा कडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी उत्पादनास थेट बाजारात नेण्या एवजी त्यावर प्रक्रिया करून बाजारात आणणे व योग्य विपणन करणे(Marketing) गरजेचे आहे. त्याच बरोबर या प्रक्रिया उत्पादनंचे merchandising सुद्धा जरुरीचे आहे आणि वेळमावस्य सारख्या कृषी पर्यटन उत्सवातून हे सद्य होऊ शकते. कोकणातील पोफटी पार्टी, जळगांव खान्देशातील शेव भाजी -वांग भरीत पार्टी, हुरडा पार्टी या सारख्या ग्रामीण उत्सवातून कृषी अर्थव्यवस्थेची प्रगती होऊ शकते. agritourism करता या Rural event फार फायदेशीर ठरू शकतात.



No comments:
Post a Comment