Tuesday, 17 April 2018

हेलिकॅप्टर


एप्रिल-मे १९९१ ची गोष्ट असेल, मी त्या वेळी साधारण पाच-साडे पाच वर्षांचा होतो. भारतात त्यावेळी सार्वत्रिक निडणूकीचे वारे वाहत होते. देशातील सर्व बडे नेते गावो-गावी जाऊन आप-आपल्या पक्षाचा प्रचार करत होते. राजकारण समजण्याचे तर माझे वय नव्हतेच आणि त्यात निवडणूक वगैरे तर फार लांबची गोष्ट, पण कोणीतरी आपला राजा असतो आणि त्या राजाचा राज्याभिषेक अशी काहीशी जुजबी माहिती माझी. लहानपणा पासून छत्रपती शिवाजी महाराज आणि रामायण-महाभारतातील गोष्टी ऐकून माझा असा समाज झाला होता असे मला वाटते.
मी त्यावेळी मराठवाड्यातील बीड या जिल्याच्या ठिकाणी राहायला होतो, माझ्या वडिलांची सरकारी खात्यातील नोकरी बीडला असल्यामुळे आमचे घर बीडला होते. शाळेत जात होतो पण बालवाडी किंवा त्यासामान काही तरी वर्गात असेल. त्यावेळी या निवडणुकीच्या वातावरणांत कदाचित काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचार करीता असेल पण त्यावेळचे काँग्रेस अध्यक्ष मा. पंतप्रधान राजीव गांधी येणार होते. त्यावेळी माझी राजीव गांधी या चरित्राची ओळख फक्त या देशाचा राजा अशीच होती. आज जरी मी वैचारिक दृष्ट्या काँग्रेस चा विरोधक असलो आणि संघ विचारांचा समर्थक असलो तरी मला हे मान्य करायला आवडेल, मी त्यांना त्यावेळी या देशाचा राजा मानत होतो(देशाचे नेतृत्व करणारा मानत होतो) आणि अशा वेळी मा. राजीव गांधी यांची सभा बीड ला होणार होती.
सभेचे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी होते आणि माझ्या घरा पासून खूप जवळ होते. शहरात जिल्या क्रीडा संकुल आहे त्याच्या मैदानावर त्याची सभा होणार होती त्या सभेला माझ्या दोन काकांनी त्या सभेला जायचे ठरवले होते. अर्थात माझे घर किंवा माझे काका हे काँग्रेस विचारंशी फार काही अनुकूल होते असे नाही किंवा राजीव गांधी यांच्या वक्तृत्वा करीत उपस्थित राहावे असा ही काही विषय नव्हता. पण सभेला जायचे खरे कारण म्हणजे राजीव गांधी यांना घेऊन येत असलेल्या हेलिकॅप्टर ला पहाणे. त्यावेळी हेलिकॅप्टर हे फार प्रचलित वहाण नव्हते. आज जरी हेलिकॅप्टर विमान या दोन्ही गोष्टी सर्व सामान्य माणसाच्या आवाक्यातल्या असल्या तरी त्यावेळी तसे नव्हते, त्यावेळी सर्व सामान्य माणसा कडे चार चाकी गाडी असणे ही सुद्धा खूप मोठी गोष्ट होती. आशा वेळी हेलिकॅप्टर बघायला मिळणे ही पर्वणीच. आणि आज सुद्धा ग्रामीण भागात प्रचारासाठी आलेले हेलिकॅप्टर पहायला तुडुंब गर्दी पडतेच, सभे साठी गर्दी जमवण्या करीता हेलिकॅप्टर उपयोग्य केलाच जातो. हेलिकॅप्टर पाहण्या साठी माझा काकांनी मला न्यायचे ठरवले. हेलिकॅप्टर मैदानाच्या बाजूलाच केलेल्या छोट्याशा हॅली पॅड वर उतरणार असल्यामुळे आम्ही सर्वानी मैदान लागतच असलेल्या एका उंच इमारती वर जाऊन हे हेलिकॅप्टर उतरताना पुन्हा उडताना पाहिले.

मैदानात काँग्रेस पद्धतीचे ऊंचच-ऊंच व्यासपीठ बनवलेले होते, त्या व्यासपीठावर तीन ते चार लोक बसू शकतील इतकीच जागा होती. ज्यामध्ये एक वक्ता, उमेदवार, प्रदेश अध्यक्ष किंवा मुख्यमंत्री आणि एक दोन सुरक्षा रक्षक असतात. या प्रकारचे व्यासपीठ ही सुद्धा काँग्रेसच्या प्रचार सभांची USP असते. कदाचित सर्व-सामान्य काँग्रेस नेतृत्व यांच्यातील फरक दाखवण्यासाठी याची निर्मित करत असतील. त्या दिवशी मा. राजीव गांधी काय बोलले हे मला माहीत नाही किंवा समजले नाही. त्यानंतर काही दिवसांनीच म्हणजे २१ मी रोजी त्यांची तामिळनाडू येथील प्रचार सभेत हत्या झाली. देशाने एक युवा नेतृत्व हरवले, जर राजीव गांधी जिवंत असते तर देशाचे राजकारण कशा प्रकारे असते हे सांगणे कठीण आहे कारण राजकारणात जर-तर ला अर्थ नसतो. पण हेलिकॅप्टर पाहण्याच्या नादाने का होईना मी माझ्या जीवनातील पहिली राजकीय सभा अनुभवली आणि ती सुद्धा काँग्रेस ची...... 


धन्यवाद                                                                                                                                    विराज 

2 comments:

  1. छान अनुभव देवडीकर साहेब ...
    वाचतांनी मी पण असल्याच एका सभेच्या आठवनीत रमलो.

    वर्ष नेमकं आठवत नाही पण पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिलेला हेलिकॅप्टर नक्की आठवतोय, मी माझ्या आजोबांसोबत गेलेलो, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रांगण ता. आमगाव जि. (तत्कालीन भंडारा) गोंदिया येथे आणि हेलिकॅप्टरनी आले होते महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेब ...

    ReplyDelete