२००० च्या दशकात दूरदर्शन मराठी, "सह्याद्री" वाहिनी त्यावेळी म्हणायचे का नाही ते आठवत नाही, त्यावर एक डैली सोप यायचा, "महाश्वेता" नावाने, त्याचा टायटल ट्रॅक फार सुंदर कंपोज केला होता, लताबाईंचा आवाज होता आणी त्याहून ही सुंदर त्याचे बोल होते, "भय इथले संपत नाही"...या गीतानेच माझी कवी ग्रेसशी ओळख झाली, मी तसा गद्यांच्या रुक्ष प्रांतात वावरणारा पण ज्या काही मोजक्या कवींनी माझी कवितेची ओळख करून दिली त्या पैकी #शांताबाईशेळके, #ना_धो_महानोर, #कुसुमाग्रज, #सुरेशभट, #राजाबढे आणि #ग्रेस...हे मनाला भाळलेले कवी, यांच्या कविता आपसूक ओठांवर रेंगाळत राहतात आणि मनाला ताजे पण आणतात... पण त्यात ही ग्रेसांच्या कवितांची मांडणीचा काही अलग होती, ती जितकी मधुर होती तितकीच गूढ, समजण्यास कठीण अशी...त्यांचे शब्द हे माधुर्य होते आणि अज्ञात त ही होते जसे की
तुला पाहिले मी नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
तुझी पावले गे धुक्याच्या महाली
ना वाजली ना कधी नादली
निळा गर्द भासे नदीचा किनारा
न माझी मला अन तुला सावली ..!!!
ही कविता असेल त्यांची किंवा ही असेल
घडवीन असे मी वृत्त
प्राणांच्या अलगद खाली
अन करीन पाऊस इथला
शब्दांच्या पूर्ण हवाली.
मावळत्या सूर्यफुलांचा
तू गळ्यात घेशील हार
खडकावर पडते जैसी
अज्ञात जलाची धार...!!!
अशा या अज्ञात कवी'स स्मृती दिनी आदरांजली.......
©विराज

No comments:
Post a Comment