इतिहासात असे दोन पंतप्रधान
आपल्याला दिसून येतात जे त्यांच्या समकालीन राजकारणात एकमेव अद्वितिय बनले ते त्याच्या
जवळ असलेल्या अलौकिक वक्तुत्वा मुळे, राजकारणांत कसलीही पार्श्ववभूमी नसताना फक्त आणि
फक्त आपल्या वक्तृत्व क्षमतेवर विश्वास ठेऊन आणि त्याच भांडवलावर त्या त्या महान देशांची
सर्वोच्च पद भूषवले. ब्रिटन सारख्या त्या वेळच्या महासत्तेचे प्रमुख आणि दुसऱ्या महायुद्धात
ब्रिटन ला पराभवाच्या छायेतून बाहेर काढणारे विनस्टर्न चर्चिल आणि दुसरे श्रध्देय अटल
जी. वक्तृत्व ही एक कला आहे पण या कलेचा जन माणसावर प्रचंड प्रभाव दिसून येतो. वक्तृत्वातूनच
मृतांच्या देशाला जागवत येते हे आपण स्वतंत्र युद्धाच्या वेळी बघितलंच आहे. वक्तुत्व
हे अटल जीना लाभलेली अशी संजीवनी होती ज्यमुळे त्यांनी असंख्य युवा मनानं जागृत केलं
व राष्ट्र कार्य करिता प्रेरित केलं. स्वातंत्रवीर सावरकरांच्या काव्य पंगती प्रमाणे,
"गुणसुमने मी वेचियली या भावे की तिने सुगंधा घ्यावे, जरि उद्धरणी व्यय न तिच्या
हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा" त्याप्रमाणेच अटल जी आयुष्यभर भारत मातेच्या
सेवे करीत त्याच्या या कलेची जोपासना करात राहिले, आणि त्याच्या वक्तृत्वाचा सुगंध
भारत मातेच्या सुपुत्राने प्रेरित करत राहिला.
त्यांच्या भाषणाची खूप वैशिष्ट्ये
सांगता येतील, भाषे वर असणारे प्रभुत्व तर आहे, शब्दांची मांडणी आहे. दोन वाक्य मधील
अंतर आहे (पॉज). डोळ्यातून श्रोत्यांशी जोडलेले नाते आहे. आवाजात असलेली गंभीरता आणि
त्यामुळे चेहऱ्यावर दिसणारा दृढ निश्चय. या अशा त्यांच्या जमेच्या बाजू होत्या आणि
त्यामुळे श्रोता खेळून रहात असे. त्याच्या भाषणातून वक्ता आणि श्रोता यांच्यात एक नाते
निर्माण झालेले दिसते. एक दृढ निश्चय त्याच्या शब्दा शब्दातून जाणवायचा जो या भारत
भूमीला बलशाली बनवण्यासाठी संकल्पित होता.
त्यांच्या भाषणात विरोधकांना
वर टीका केलेली असे पण ती टीका कधी बोचणारी नसे, विरोधकांना सुद्धा ती टीका आपलेशी
वाटे. अटल जी स्वतःच्या शब्दांचे मूल्य जाणत होते, त्यामुळे त्यांचे महत्व त्यांनी
होते. त्यामुळेच इंदिरा गांधींना "दुर्गा" कधीही म्हटले नाही या मतावर ते
ठाम होते तसेच पं. जवाहरलाल नेहरूंनी त्यांना "भावी पंतप्रधान" कधीच म्हटले
नाही या वर सुद्धा ठाम होते. दोनीही वाक्यांचा राजकीय लाभ त्यानं चांगला घेता आला असता
पण त्यांनी ते टाळले.
शब्दांच्या माध्यमातून त्यानी मन-मनात निर्माण केलेला
विश्वास त्यानं या देशाच्या सर्वोच्च पंतप्रधाना पैकी एक बनून जातो. माझ्या सारख्या
अती सामान्य व नवोन्मुख वक्त्यास त्यांचे वक्तृत्व सदैव प्रेरणादायी व अभ्यासनीय राहिले
आहे. त्यांच्याच शब्दात शेवट करताना त्याच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन
“हार
नही मानूगा, रार नही ठानुगा,
कल
के कपाल पर लिखता, मिटाता हूँ|
गीत
नया गाता हूँ|”
वंदे मातरम विराज

No comments:
Post a Comment