#वर्षाचा_दिवस_३१९_वा,
आज दिवाळीची सुट्टी संपून गावा कडून निघालो, सोलापूर मार्गे पुणे रस्ता चांगला असल्यामुळे त्या मार्गे जायचे ठरवले. अनेकदा या मार्गे आलो आहे त्यामुळे विशेष अडचण नव्हती आणि निवांत वेळ होता म्हणून थोडी भटकंती करायची ठरवली. याच मार्गा वरती आमचे मूळ गाव असल्याचे अनेकांना कडून ऐकले होते, ते हुडकायचे व तेथे जायचे ठरवले. सोलापूर कडून पुण्याकडे जाताना कोठे तरी मोहळ तालुक्यात आमचे मूळचे गाव "देवडी" आहे असे माहीत होते. दुपारी सोलापूरला जेवण केले आणि गुगल मावशीला देवडी या गावचा पत्ता विचारला, गुगल मावशींनी तत्परता दाखवत लगेच गाव शोधून काढले. सादरण पुण्याकडे येताना मोहळ पासून १९ किमी अंतरावर एक छोटा उजव्या हाताला फाटा फुटतो. तेथून २किमी वर ५००० आसपास लोक वस्तीचे देवडी हे गाव आहे. आम्ही पोहनचला तेव्हा दुपारचे अडीच वाजले होते.
गावात तसे परिचित कोणीच नव्हते. मला माहित असलेल्या पैकी आमच्या पूर्वजांनी त्या गावात बांधलेले एक दत्त मंदिर आहे असे कळले होते. त्याबद्दल काही माहिती मिळते का हे पहावे म्हणून गाडी खाली उतरलो आणि दुकानदारांना विचारले आणि मंदिराचा पत्ता मिळाला. मंदिरा पर्यंत गाडी जाते असे सुद्धा दुकानदराने सांगितले. छोटस गाव असल्यामुळे काही अंतर जाताच गाव ही संपलं आणि मंदिर सुद्धा सापडले नाही. पण गावची ग्रामपंचायत सापडली, ग्रामपंचायती जवळ कोणी न कोणी असेल किंवा मंदिर तरी असेल म्हणून ग्रामपंचायती जवळ गेलो, तर तेथे चावडीवर काही म्हातारे लोकं रम्मी चा डाव टाकून खेळत होते. चावडी वरच्या एका म्हाताऱ्याला, "राम-राम" घालून दत्त मंदिरा बद्दल विचारले तेव्हा, "पाव्हणं कोण तुम्ही" असा प्रति प्रश्न केला, मी माझे नाव, "देवडीकर" सांगितल्यावर त्यांनी "कोणचे देवडीकर", असे विचारले मला पहिल्यांदा तो प्रश्न जातीवाचक वाटलं पण लगेच त्या म्हाताऱ्या लोकांनी माझ्या चुलत दोन-तीन आजोबांची नावे घेतली. मी त्याचा नातू आहे असे सांगताच त्यातील एकाने दत्त मंदिरा चा पत्ता सांगितला, सोबत रस्ता सुद्धा दाखवायला निघाला. मी गाडी बोलावली आणि चालत त्या म्हताऱ्या आजोबा सोबत दत्त मंदिरा पर्यंत आले. फार अंतर नव्हते, छोटा स दत्त मंदिर एका चौथऱ्यावर बांधलेले होते, १००-१५० sq feet चा चौथरा आणि त्यावर ५०-६० sq feet चे मंदिर आहे. दगडी बांधकाम असलेले हे मंदिर, त्यात दत्तात्रयांच्या पादुकांची स्थापना केली आहे. मंदिरात मूर्ती नाही, म्हताऱ्या आजोबांनी सांगितल्या प्रमाणे दर गुरुवारी मंदिरात पूजा होते, इतर दिवशी फक्त दिवा बत्ती केली जाते. मंदिराला एक लोखंडी दरवाजा आहे व मंदिराच्या उजव्या बाजूस औदुंबराचे झाले आहे. त्या म्हाताऱ्या आजोबानी सांगितल्या प्रमाणे त्या मंदिराची स्थापना माझ्या खापर पंजीने किंवा त्यापूर्वी देवडीकर या परिवारातील स्त्रीने केली होती, श्री क्षेत्र गाणगापूर येथून दत्तात्रयांच्या दगडी पादुका आणून येथे त्याची स्थापना केली होती अशी माहिती मिळाली, दत्त जयंतीला या मंदिरात छोटासा उत्सव सुद्धा साजरा केला जातो.
याच मंदिराच्या समोर त्याकाळी आमची काही शेत जमीन होती आणि मंदिराच्या पाठीमागील बाजूस वाडा होता. वय वर्ष ८० च्या आसपास झुकलेल्या त्या म्हताऱ्या आजोबानी आम्हला सांगितली. १९ व्या शतकाच्या सुरवातीला कधीतरी आमचे पूर्वज या देवडी गावातून उस्मानाबाद जिल्यातील वाशी येथे स्थलांतरित झाले होते. त्यानंतर सुद्धा अनेक वर्ष माझ्या आजोबा पर्यंत या गावाशी आमची संबंध होते, पण मागील ३०-३५ वर्षात या गावाशी किंवा गावातील लोकांशी आमचा थेट संपर्क आला नव्हता. मंदिरामागील वाडा आता पूर्णपणे पडला आहे, काही भग्न अवशेष शिल्लक आहेत.
वापस गावात येताना अजून
काही म्हाताऱ्या लोकांशी बोलणे झाले, त्यांच्या कडून सुद्धा याच प्रकारची माहिती मिळाली. पण आमच्या पूर्वजांनी या
गावातून स्थलांतर का केले?
या प्रश्नाचे उत्तर अजून
शिल्लक आहे.
त्याच बरोबर अजून बरीच
माहिती या
गावा बद्दल मिळवणे बाकी
आहे. सध्या एवढेच
धन्यवादवापस गावात येताना अजून काही म्हाताऱ्या लोकांशी बोलणे झाले, त्यांच्या कडून सुद्धा याच प्रकारची माहिती मिळाली. पण आमच्या पूर्वजांनी या गावातून स्थलांतर का केले? या प्रश्नाचे उत्तर अजून शिल्लक आहे. त्याच बरोबर अजून बरीच माहिती या गावा बद्दल मिळवणे बाकी आहे. सध्या एवढेच
धन्यवाद



No comments:
Post a Comment