मागच्या आठवड्यात “कांतरा” पाहिला, हिंदी मध्ये भाषांतरित झाल्यावर थेटर मध्ये जाऊन पाहिला. मागील वर्षा पासून दक्षिण भारतातील फिल्म कन्टेन्ट वरती विशेष लक्ष देऊन आहे. मग तो “असुरन असेल किंवा कर्नन, मंडेला असेल किंवा जय भीम” असेल. प्रत्येक कलाकृती स्वतःचे वेगळेपण टिकून आहे. कांतरा हा त्याच निर्मिती मधला भाग आहे. दाक्षिणात्य चित्रपट सुष्टी म्हटलं कि आपल्याला तेलगू किंवा तामिळ चित्रपट आठवतात पण या दोन भाषा व्यतिरिक्त कन्नड भाषेतील चित्रपट सुद्धा वेगळे अस्तित्व टिकवून आहेत आणि कांतरा त्यातीलच एक. ऋषभ शेट्टी या लेखक अभिनेता दिग्दर्शकाणे एक वेगळा प्रयोग या चित्रपटाच्या माध्यमातून कन्नड चित्रपट सृष्टीत केला आणि रसिकांनी त्याला भर भरून प्रतिसाद दिला असे म्हणावे लागेल. हा चित्रपट ३० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आणि या दिवाळीत हिंदीत भाषांतरित झाला. सुरवातीच्या काही दिवसात या चित्रपटाने कमाईचा विक्रम रचला व सामान्य प्रेक्षकाला थेटर मध्ये आकर्षित केले. दाक्षिणात्य चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे चांगल्या विरुद्ध वाईटाची लढाई किंवा प्रस्थापिता विरुद्ध सामन्याचे युद्ध, कथानकाचा हाच गाभा घेऊन लेखक दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांनी चित्रपटाची रचना केली आहे. १८०० शतकातील दंतकथेत एक राजा त्याची जंगलातील जमीन तेथील स्थानिक आदिवासींना देऊन टाकतो एका दैवी शक्तीला खुश करण्यासाठी व त्या बदल्यात तो राजा स्वतःचे व स्वतःच्या कुटुंबाचे अभय या दैवी शक्ती कडून मागतो. कथानक पुढे सरकते व पोहंचते १९९० च्या दशकात जेव्हा त्याच राज घराण्यातील एक वंशज (देवेंद्र) जंगलाची जमीन तेथील आदिवासी लोकांकडून बळकवण्याचा प्रयत्न सुरु करतो. या करीता त्याला मदत करत असतो त्याच्या वर अंधळाविश्वास ठेवलेला त्याचा नौकर शिवा (ऋषभ शेट्टी). पण कथानकात येणाऱ्या एका ट्वीस्ट मुळे शिवा राजाच्या वंशजा विरुद्ध उभा राहतो आणि आदिवासी लोकांना मूलभूत हक्क मिळवण्यासाठी लढतो. तो या लढ्यात यशस्वी होतो का नाही आणि त्याला कोणकोण साथ देते हे चित्रपट पाहिल्यावरच आपल्याला लक्षात येते. हा भयपट असल्यामुळे हॉरर दृश्य आणि त्या प्रमाणे पार्श्व् संगीताची मांडणी व जंगलाचे चित्रीकरण या मुळे चित्रपट आणखीन आकर्षित होतो.
या चित्रपटाचे अजून एक
वैशिष्ट्य म्हणजे भगवान विष्णूचे वराह अवतारातील असलेले लोकनाट्य ज्याला कर्नाटकच्या
किनारपट्टी भागात “भूत कोला” असे म्हटले जाते. हा एक नृत्य प्रकार आहे यातील नृत्य
नर्तक म्हणजे "कोला" हे भगवान वराह चे द्वारपाल म्हणून ओळखले जातात. ते दुष्ट आत्म्यान पासून वन आणि आदिवासींचे रक्षण करतात अशी मान्यता आहे. त्या दैवी शक्तीच्या वार्षिक उत्सवात हे भूत कोला होत असते आणि हे लोकनाट्य
सादरकरणाऱ्या कलाकारांच्या अंगात त्या दैवी शक्तीचा संचार होत असतो. ती दैवी शक्ती
त्या कलाकारांच्या माध्यमातून आदिवासी लोकांशी संवाद साधत असते अशी येथील लोकांची मान्यता आहे. भगवान बिसरा मुंडा यांच्या प्रमाणेच हा द्वारपाल वनवासी आणि
आदिवासींना एकत्र करून त्यांचा हक्का करिता लढत असतात, वनवासी समाजच्या संघर्षाचे नेतृत्व हे
"कोला" करतात. त्या संघर्षाचे चित्रण या चित्रपट केले आहे. या चित्रपटातून वनवासी आणि आदिवासी समाजाची हिंदू प्रथा
परंपरेवर असलेली श्रद्धा दिसून येते.
हा चित्रपट जरूर पहावा
कथानकाची वेगळी मांडणी, सर्व कलाकारांचा अभिनय
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे "भूत कोला" व त्याचा नृत्य प्रकार प्रचंड
आकर्षण निर्माण करतो. "वराह रुपम" या गाण्यासाठी सुद्धा चित्रपट
पाहावा, गाण्यात वाजणाऱ्या गूढ पण
श्रवणीय सनई ऐकावी अशी आहे.
विराज वि देवडीकर


No comments:
Post a Comment