नागराज मंजुळे आणि काही तरी वेगळं आस समीकरण आता दुर्लभ होत चालल्या बहुतेक, "घर, बंदूक, बिर्याणी" च्या निमित्याने हे जाणवते. पिस्तुल्या, फॅड्री, नाळ यात सामान्य पटकथा पण वेगळ्या मांडणी मुळे आकर्षित करतात तर सैराट, झुंड या चित्रपटा करतात अनेक आकर्षणाचे बिंदू वापरले आहेत त्यात सैराट हा प्रचंड लोकप्रिय झालेला चित्रपट तर अमिताभ बच्चन असून सुद्धा झुंड म्हणावा तसा यशस्वी झाला नाही. "घर, बंदूक, बिर्याणी" हा नावा मध्ये वेगळेपण घेऊन आलेला चित्रपट असला तरी फार आकर्षित करत नाही. चित्रपटाच्या पटकथेचा वास्तवाशी फार संबंध नाही, या पूर्वीचे नागराज आण्णा यांच्या चित्रपटात वास्तवाला धरून असलेली पटकथा होती आणि तेच नागराज आण्णा च्या चित्रपटाचे यश होते.
ह्या चित्रपटात तीन मुख्य
पात्र भवती फिरत आहे, राय पाटील (नागराज आण्णा), पल्लम (सयाजी शिंदे) आणि
राजू (आकाश ठोसर). तिघे ही कसलेले अभिनेते आहेत आणि हेच या चित्रपटाचे आकर्षण
बिंदू आहेत. हि एक काल्पनिक कथा कोलागड परिसरातील आहे ज्यात पल्लमा नक्षलवादी, उग्रवादी लोकांच्या गटाचा
मोरक्या असते, तर राजू त्याच परिसरात
एका ढाब्यावरील आचारी असते. राजू कोलागड परिसरात त्याच्या नॉन व्हेज बनवण्यामुळे
प्रसिद्ध असतो व त्यामुळेच राजुचे या
नक्षलवादी गटा करून अपहरण होते, राजुचे लक्ष्मी (सायली पाटील) वर प्रेम असते आणि त्याला
तिच्याशी लग्न करायचे असते,
तर लक्ष्मीचे वडील राजुला
लग्नांना करिता स्वतःच्या "घराची" अट घालतात. अपहरण झाल्यावर राजुला
कळते नक्षलवाद्यांशी फितुरी करून पोलिसांना शरण गेल्यावरती पोलीस "घर"
देतात, तर राय पाटील हे पोलीस
इन्स्पेकटर या कोलागड परिसरात पल्लमा टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी आलेले असतात. आता
नेमके राजुला घर मिळते का नाही आणि राय पाटील, पल्लमा व राजू एकमेकांसमोर आल्यावर काय होते हे चित्रपट
पाहिल्यावर तुम्हला लक्षात येईल.
चित्रपटाचा पूर्वाध
पात्रातील संवादा मुळे विनोदी आहे तर उत्तरार्धा
काहीसा गंभीर आहे. चित्रपटाचे पार्श्व संगीत आहि गाणे ठीक आहेत, काही गाणे उगाच वाढवल्या
सारखे वाटतात. एकूण २ तास ४१ मिनिटांचा चित्रपट निव्वळ मनोरंजन म्हणून पाहण्यास
हरकत नाही. मात्र नागराज अण्णांच्या या पूर्वीच्या चित्रपटांची अपेक्षा ठेऊन
तुम्ही पाहण्यास जाणार असाल तर तुमचा भ्रमनिरास होईल. चित्रपट पाहायचा कि नाही हे
प्रेक्षकांनी ठरवायचे आहे पण नागराज मंजुळे यांचे वेगळेपण या चित्रपटात दिसत नाही
हे नक्की....
विराज

No comments:
Post a Comment