Monday, 24 December 2018

हेमंतशिबीर


आज संघ शिबीर भेट देण्याचा योग्य आला, पुण्यात कोंडव्या जवळ #येवलेवाडी येथे #राष्ट्रीय_स्वयंसेवक_संघाचे #हेमंतशिबीर(बाल विभाग) सध्या सुरू आहे २२ ते २५ डिसंबर २०१८, व्यवस्थे मध्ये स्वच्छता विभागात कार्यकर्ता म्हणून काम केले त्या निमित्याने हेमंत शिबिराला भेट देता आली. मागच्या चार पाच वर्षात पुण्यात संघ कार्याशी जोडला गेल्या पासून पहिल्यांदाच शिबिराला गेलो होते. लहानपणी धाराशिवला असताना हेमंत शिबिराला जायचो, १८-१९ वर्ष झाली असेल शेवटचे शिबिराला जाऊन, कळंब चे शिबीर ज्याला स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहिलो होतो. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडीत होती, मांजरा नदीच्या काठवरती तुडुंब भरलेल्या नदी पात्रा शेजारी शिबिराच्या राहुट्या होत्या. प्रचंड कडाक्याची थंडी रात्री आणि पहाटे च्या वेळी पडलेली असायची, दोन रात्र आणि तीन दिवस हे शिबीर होते, एक वेगळा अनुभव असतो संघ शिबिर. सर्व सदारणपणे हेमंत शिबिर हे नाताळाच्या सुट्ट्याच्या आसपास असते त्याचे एकमेव कारण म्हणजे अत्यंत कठीण अशा कडक थंडीच्या काळात निसर्गाच्या सानिध्यात राहने. हेमंत शिबीर म्हणजे एक वेगळीच मज्जा असते, सकाळी पाच च्या नादावर उठायचे, प्रातःविधी आटपून संघस्थान वरती जमने मग ध्वजारोहण होऊन प्रातः शाखा लावणे, त्यानंतर चे कार्यक्रम व्यायाम, सूर्यनमस्कार, दंड बैठक, मैदानी खेळ होतात ज्यातून शरीरात ऊर्जा निर्माण होते. मग न्हारी आणि बौद्धिक वर्ग होतात, दुपारी जेवायची सुट्टी विश्रांतीची वेळ असते मग पुन्हा सायं शाखा आणि बौद्धिक वर्ग. रात्रीच्या जेवना नंतर विविध गुण दर्शन कार्यक्रम म्हणजे मनोरंजन सत्र सुरू होते. कुणी कविता म्हणते तर कुणी एक पत्री नाटक सादर करते, कोणी विनोद सांगतो तर कोणी कथेतून राडवतो आणि कोणी शिव कर्तृत्वाचा पोवाडा गातो. जेवढे स्वयंसेवक तेवढ्या अनुभूती, इथे जात-पात, उच्च निच्च, वर्ण आणि कर्म भेद असे काही नसते. इथे सर्वच स्वयंसेवक असतात आणि हे सर्वच समाज बांधव असतात, इथे सगळेच एकमेकांच्या मांडीला मंडी लावून जेवायला बसतात आणि एकमेकांच्या खांद्याला खांदे लावून राष्ट्रा करीता उभे राहतात

एक आठवण म्हणून सांगतो,१९३० च्या आसपास हेमंत शिबीर वर्ध्याला . पु. महात्मा गांधी राहत असलेल्या बिर्ला भवनच्या जवळच चालू होते. त्यावेळी महात्मा गांधी तेथेच वास्तव्यास असल्यामुळे शिबीर प्रमुकांनी आदरणीय गांधीजी ना शिबीर भेटीस आमंत्रित करण्याचे ठरवले. त्याप्रमाणे संपर्क साधून गांधीजी ना आमंत्रित केले, त्यांनी ही ते स्वीकारले एके दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी त्यांनी भेट दिले. शिबीर प्रमुख, कार्यवाह इतर पदाधिकारी त्यांच्या सोबत होतेच ते विविध विषयाची माहिती गांधी जी ना देत होते, गांधीजी सुद्धा ही सर्व माहिती उत्सुकतेने ऐकत होती प्रती प्रश्न करत होते. बोलता बोलता ज्यावेळी भोजन कक्षात गांधी जी आले त्यावेळी त्यांनी शिबीर प्रामुख्यानं उद्देशून प्रश्न केला की "या जेवण्याच्या पंगतीत बसलेल्या स्वयंसेवक पैकी किती सवर्ण आहे किती हरिजन आहे??" या प्रश्नाने चकित झालेले शिबीर प्रमुख आदराने उत्तरले जाती वरून संघात विभागणी होत नाही त्यामुळे आम्ही याची नोंद घेतलेली नाही. .पू. गांधी जी या उत्तराने सुखवले. देशाच्या एकात्मतेचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघा कडून घडत असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.
जरूर एकदा तरी भेट द्यावी आपल्या जवळच्या हेमंत शिबिराला.

वंदे मातरम।                                                                                                                    ©विराज

No comments:

Post a Comment