Thursday, 6 December 2018

महामानव


स्वातंत्र, समता आणि बंधुता…

या तीन तत्त्वांनी नवं समाजाची आणि भारताची निर्मिती केली. शिक्षण हे वाघिचं दूध आहे आणि ते पिऊन मानवाचा महामानव होतो हे त्यांनी दाखून दिले. राजकीय स्वातंत्र्य बरोबरच सामाजिक स्वातंत्र्य सुद्धा जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्या असेल तरच राजकीय स्वातंत्र्य टिकू शकते हा विचार मांडला, हा विचार घेऊन एक सामाजिक सर्वव्यापी लढा त्यांनी उभारला. हजारो वर्षे गावंकुसा बाहेर टाकल्या गेलेल्या समाजाला एकत्र करून अन्याय विरुद्ध लढायला शिकवले, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला. "शिका, एकत्र व्हा आणि लढा " हे त्रिसूत्रच त्यांनी त्या समाजाला दिले. पानवठ्याच्या पाण्या पासून ते मंदिरातल्या प्रवेश पर्यंतचे हक्क त्यांना मिळून दिले. हिंदू समाजाला ग्रासलेल्या जातीपातीच्या रोग पासून मुक्त करण्यासाठीचे पहिले पाऊल या महामानवाने उचलले. ती बंडखोरी होती प्रस्थापितांच्या विरुद्ध पण हजारो लाखो जन-मानवाला उद्घारन्या करिता लढा त्यातून निर्माण झाला
शिक्षणातून ज्ञान मिळले, ज्ञानातून प्रेरणा मिळाली, प्रेरणेतून लढा उभारला, लढ्यातून नेतृत्व निर्माण झाले आणि नेतृत्वातुन महानायक निर्माण झाला त्या  महानायकाने महान देशाचे संविधान लिहले. भारतीय संविधानाचे ते निर्माते झाले. सर्वसामान्य व्यक्ती पासून सर्वमान्य व्यक्ती एकाच पातळीवर भारतीय संविधानाने आणल्या. जन्माचे श्रेष्ठत्व अमान्य करत कर्माचे मोठेपण मान्य केले. अत्यंत सामान्य असलेल्या अनेक व्यक्ती त्यामुळेच या महान देशाचे नेतृत्व करू शकल्या ते या महामानवाच्या दूरदृष्टी मुळे. भारतात जन्मलेला आणि जगाला धम्माची, शांततेची शिकवण देणारा बौद्ध धर्म स्वीकारला. आपल्या अनुयायांना पंचशील तत्वांची शिकवण दिली. नवं भारतीय समाजाची निर्मिती केली.     

महामानव डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...!!!

No comments:

Post a Comment