Sunday, 2 December 2018

रविवार

रविवार सकाळ झाली ती #दिपवीर च्या भारत आगमनाने, लग्न त्यांचं, ते केलं #इटलीला आणि भारतात त्यांच्या आगमनाचे live coverage करतो कोण तर बाल बोध भारतीय मीडिया असो. आता कोणी तरी मला #feeling_nostalgic असे म्हणेल, पण एके काळी रविवार स्ट्रेच ब्लास्टर (stretch blaster)असायचं. रविवार आठवड्याच्या ऊर्जेचे स्त्रोत असायचा, सोमवार ते शनिवार काम करणे किंवा शिकणे केवळ रविवारच्या ओढीने असायचे. रविवार ची सकाळ व्हायची रंगोली ने जी दूरदर्शन या सरकारी वाहिने वरचा कार्यक्रम, त्यानंतर एका मागून एक असे कार्यक्रम असायचे ज्या करीता आठवडा भर वाट पहावी लागायची. त्यावेळी डेली सोप नव्हत्या वीकली सोप असायच्या त्यामुळे आठ दिवस एकाच मालिके बद्दल चर्चा असायची. लहानमुलानं शक्तिमान असेल किंवा disney cartoon series हिंदीतली असेल नाहीतर पौराणिक मालिका असतील. दुपारी साडे बारा ते दीड हा एक तास प्रक्षेपण प्रादेशिक वाहिन्यातून व्हायचे, त्यावेळी छायागीत नावाचा मराठी गाण्याचा कार्यक्रम लागायचा. त्यानंतर पुन्हा दिवस भर नॅशनल नेटवर्क असायचे. संध्याकाळी पुन्हा ६ ते ९ वेळेत प्रादेशिक भाषेत चित्रपट दाखवले जायचे. त्याच बरोबर रविवारी दररोजच्या जेवणात सुद्धा बदल असायचे पोळी-भाजी, वरण-भात, भाजी भाकरी जाऊन त्या दिवशी मटण-चिकन-मासे असा नॉन-व्हेज कुटुंबात ला बेत असायचा तर व्हेज कुटुंब इडली-डोसा, वडा संभार या प्रकारचे बेत बनवायचे. खरेदी करण्यासाठी रविवार हा ठरलेला वार असायचा, साप्ताहिक खरेदी तर लोक करायचेच पण राखीव खरेदी ही याच दिवशी व्हायची. ज्यामुळे पूर्ण कुटुंबात आनंद तर असायचाच पण एक ओढ रविवारची असायची.
-----------------------------------------------------------------------
जस-जस #ग्लोबलायजेशन भारतात उतरू लागलं तसं-तसं रविवारचा महत्व कमी व्हायला लागले. मुळात #जागतिकीकरणा मूळे जगाच्या अर्थकारण, समाजकारण आणि राजकारण यात आमूलाग्र बदल झालेला आहे आणि त्यामुळे मनोरंजना वर सुद्धा परिणाम झाला आहे. आज आपल्या कडे असंख्य प्रकारच्या वाहिन्या उपलब्ध आहेत त्यावर अनेक मालिका आंबट-गोडं चवीच्या आपण दररोज पहातच असतोत. पश्चिमात्या देशातून कॉपी केलेले डेली सोप भारतात आले, त्याबरोबर त्यांच्या पद्धतीचे राहणीमान सुद्धा भारतीयांनी स्वीकारले. जागतिकीकरणा मुळे सेवा क्षेत्र भारतात विस्तार पावलं आणि ६ दिवसाच्या जागेवर ५ दिवसाचा आठवडा झाला, रविवारच्या सुट्टीची ओढ कमी झाली ५२ सुट्याच्या जागी १०४ सुट्या जागतिकीकरणाने सामान्य माध्यम वर्गाच्या पदरात पडल्या आणि रविवारच्या सुट्टीचे महत्व कमी झाले. उत्पादन क्षेत्रात साप्ताहिक सुट्टी रविवार सोडून इतरच वारी असते किंवा कामगारांच्या गर्जे नुसार ती घेता येते. साप्ताहिक सुट्टीच्या या बदला मुळे सामान्य माध्यम वर्गाच्या गरजा आणि आर्थिक घडामोडीत खूप बदल झालेला दिसतो. त्यात भर म्हणून मोबाईल व समाज माध्यमे हातात आली आणि मनोरंजनाचे विश्वच बदलले. इंटरनेटच्या माया जाळाने माणसे जवळ आणली पण नाते-संस्कृती मात्र आकुंचन पावली असे वाटते. खानपानाच्या सवयी बदल्या सामान्य खानावळीच्या जागी ब्रँडेड आऊटलेट ने घेतली, किराणा मालाच्या दुकानाच्या जागेवर मॉल उभे राहिले आणि आता तर online shopping आली. रविवार सामान्य वार झाला.
बदल ही काळाची गरज आहे आणि नवीन बदल स्वीकारूनच मनुष्याचे अस्तित्व टिकवून आहे...
©विराज

No comments:

Post a Comment